दृकश्राव्य विभाग :- कर ना कर, बांड्या बैलनी शेपटी धर (अहिराणी कथा)
जयंत काका म्हणजे एकदम सळसळता उत्साह! एक खुमासदार कथा त्यांनी आपल्या खास अहिराणी भाषेत त्यांनी दिवाळी अंकासाठी सादर केलेली आहे. मिपाकरांना नक्कीच आवडेल!


गणपतीबाप्पा गेले आणि सकाळ-संध्याकाळच्या पूजा, आरत्या, घंटानाद, सगळे बंद झाले. घर एकदम शांत शांत झाले. मी गमतीने बायकोला म्हणालो, "अगं, गणपती वर्षातून फक्त १० दिवस येतो, तरी तू इतक्या मनोभावे सकाळ-संध्याकाळ त्याची आरती करतेस. मी तुझा गणपती नसलो, तरी'पण'पती आहे, पण तू कधी माझी आरती केली नाहीस." त्यावर बायकोने तिरस्कारिक नजरेने बघून "आरती? अन तुमची?
बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.) मागच्या एका कथेत आपण आमच्या मालोजीरावांबद्दल ऐकले. मालोजीरावांची जीवनगाथा म्हणजे एक अद्भुत कादंबरी सहज होईल. पण आज आपण त्यापेक्षाही अद्भुत अशा आमच्या मित्राबद्दल वाचणार आहोत. मालोजीराव काय आणि बाळासाहेब काय, अशी माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात असे कोणी मला आत्ता सांगितले, तर मी त्याला निश्चितच मूर्खात काढेन.
माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी.
आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच.
पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे.

कवळे शाखेत बदली झाली, तेव्हा शाखा घराजवळ असल्याने मोठ्या उत्साहाने जॉइनिंग टाईम न घेता शाखेत दुसर्याच दिवशी हजर झाले. शाखेत पाय ठेवला, तेव्हा मॅनेजरची केबिन रिकामी होती. काउंटरवरचे काही चेहरे ओळखीचे होते. एक नवाच अनोळखी चेहरा 'मे आय हेल्प यू' काउंटरवर बसला होता. त्याचे वय बघता हा नवा क्लार्क नव्हे, हे सहजच लक्षात येत होते. चेहर्यावर भरपूर पावडर चिकटून बसलेली, कसला तरी उग्र वासाचा सेंट मारलेला आणि कपाळावर गंध.
झोळी पाठीवर घेतली. एक हात जमिनीवर टेकवून सावकाश उठलो. सूर्य टाळ्यावर आला होता. खडकाळ डोंगर. मृगजळांचं राज्य असलेली ती टेकाडं. हे बाभळीचं झाड किती वाळून गेलंय. कुठे एखादी पालवी दिसतेय का बघितलं. पण व्यर्थ.
खालच्या तुटक्या फांदीवर कावळा बसलेला आढळला. तो 'काव काव' असं दोनदा ओरडला. आणि इथेच आक्रीत घडलं.
देऊळ फारसं लांब नव्हतं. त्यावरची भगवी पताका अजूनही उंच फडकत होती. तिथूनच हात जोडले. सगळी त्याची कृपा. जगात कोट्यवधी कावळे आहेत. झाडून सगळे काळे. मग हाच कसा पांढरा?