Skip to main content

चितळेंपेक्षाही जास्त माजोरडे दुकान!

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 17/10/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी! =============================================================================== कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली...

गाण्यांचे शब्द व आमचे मजेशीर शब्द

लेखक dadabhau यांनी मंगळवार, 17/10/2017 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी शाळेच्या दिवसात म्हणजे बच्चनभौ शिखरावर असतांना (जेव्हा दूरदर्शन आमच्या गावात आलेले नव्हते) हिंदी मराठी गाणी फक्त रेडिओ वर च कानावर पडत ( विविधभारती म्हणजे जीव कि प्राण होता आमचा !!) आमच्या गावाच्या पूर्वेस एक ओपन टाकी ( टॉकीज नव्हे...टाकीच) होती , दर मंगळवारी म्हणजे बाजारच्या दिवशी शिनेमा बदलत असे. नवीन आलेल्या पिच्चर चे पोस्टर हातगाडीवर ठेवून ढोल ताशाच्या गजरात गावभर मिरवत असत. आम्ही मुले त्या गाडीमागे गावभर फिरून त्यांच्या जाहिरातीस हातभार लावत असू. देवीची यात्रा १५ दिवस चाले व आमच्या शाळेस सुट्ट्याच असत.

नशिब

लेखक mr.pandit यांनी मंगळवार, 17/10/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबाच काय घेऊन बसलात हो ते कधी साथ देत तर कधी नाही मनगटात ताकद हवी खर तर नाहितर् राजयोग पण कामाचा नाही परीक्षेच्या वेळीच नेहमी देव आठवतो कारण अभ्यास मन लावुन केलेला नसतो कसेतरी त्या अवघड परीक्षेत पास होता नशिबाचा भाग म्हणुन त्यालाच दोष देता हिच सवय मग अंगवळणी पडत जाते अपयश आले की नशिबावर खापर फोडले जाते थोडे प्रयत्न कमी पडतायेत बाकी काही नाही प्रयत्नांती परमेश्वर उगाच म्हटलय का कुणी? आता आळस झटका आणि लागा कामाला आयतं बसुन कधी मिळतय का कुणाला परिश्रम केल्याशिवाय यश मिळायच नाही नशिब अस सहजासहजी बदलायच नाही. - निखिल १७-१०-१७

'ती'

लेखक Mahesh Bhalerao यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 होती तिची मनीषा चौकट ओलांडून, दूर सुखाच्या गावी जाण्याची बुक्क्या मारून दाबलेलं, तिच्या पंखातलं बळ, मोठी झेप घेऊ पाहत होतं धडपडतच कशीतरी गाठली तिने मिळेल ती गाडी, कोंबून घेत स्वतःला घुसली कशीबशी आत इथेही कामी आली तडजोड, स्वाभिमानाशी केलेली, थोडी जागा मिळवण्यासाठी…... पडून होते तसेच अजून डोळ्यांच्या पापण्यात उसवलेल्या नात्यांचे धागे दोरे पण तिची नजर शोधत होती अंधुक काचातून, येणारा तिचा गाव, अन पुढे निघून गेलेलं मन… तिच्याजवळ होता, फक्त शरीराचा गोळा, चालीरितींच्या बेड्या

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - माज्या आज्याचा दारूचा धंदा

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखक :- ब्रिटिश

अभिवाचन :- अंशुमन विचारे

विशेष आभार :- किरण माने, अमोल उदगिरकर आणि छोटा डॉन

तीखी पुरी

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 मिपाकरहो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे घरोघरी फराळ, फटाके आणि पाहुणे या बिग थ्रीचे आगमन झाले असेलच. तर घरी येणार्‍या पाहुण्यांना फराळाबरोबर वाढायला आणि बच्चेकंपनीला येता जाता तोंडात टाकायला एक झटपट पाककृती आपण बघणार आहोत.

महाबळेश्वर-खेड परिसरातील सह्यभ्रमंती : दाभीळटोक घाट आणि निगडा घाट

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 'टिंग'.. अर्धवट झोपेतल्या कंडक्टरने बेल मारली आणि झोपेतच आम्हाला म्हणाला, "चला उतरा, उशीर होतोय (???)." बाहेर मिट्ट काळोख. आजूबाजूला कुठेही गावाच्या खुणा नाहीत. कदाचित स्टॉप असावा असे वाटू शकेल अशा टपर्‍यांशेजारी गाडी थांबली. आता दाभीळ फाटा स्टॉप कुठे आहे, हे आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते. गाडीतले लाईट लागले तेव्हा बघितले, तर सगळे झोपले होते. पोलादपूरला कंडक्टरने सांगितले होते की मी सांगतो तिथेच उतरा.

जेडी५८

लेखक मकरंद घोडके यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 चार वर्षं झाली आता रिटायर होऊन. VRS! सध्या माझं वय ५८. मज्जानु लाईफ. झपाट्याने दिनक्रम बदलूनच टाकला. रात्रीची वेळ ड्यूटीची - रात्री ९ ते सकाळी ६. हवेत तरंगलेला वेळ - म्हणजे काम असूनही नसल्याचा आनंद जास्त. Observation, calculation & study. ही माझी लाडकी सायकल आणि ही आपली दोस्त JD! (काळ्या बॅगेला जास्त कवटाळून) खर्च तो कसला नाहीच. सकाळी पुन्हा ६ ते २ मस्तपैकी ताणून निद्रादेवीची आराधना, रवंथ, आणि मग रात्री झालेल्या मंथनाचा निचरा. घरी जाणं येणं बरेच दिवस झालं बंदच केलंय.