पावसात २- ४ दिवस निवांत भटकायला अंतरजालावर कोल्हापुर - रत्नागिरी मार्गावरील अंबा घाटाविषयी वाचले.
हुल्लाड्बाज दारुड़े अणि गोंधळी पर्यटक यांच्या नजरेत हा भाग अजुन आला नाही असे वाटते.
मागच्या वर्षी अंबोली घाटात गेलो होतो, पण स्वतःची गाडी न न्हेता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे ठरवले त्यामुळ राती १० वाजता मुंबईतुन रेलवे पकडली आणि कणकवलीला उतरून यष्टि पकडून संध्याकाळी ४ वाजता अंबोलीला पोहोचलो. पण नुसताच २४ तास पाउस अणि धुके त्यामुळ अंबोली फिरता आली नाही. तिथल्या स्थानिक होटलवाल्याने गणपतीनंतर येण्याचा सल्ला दिला. तेव्हा तिथल्या माळरानावर खुप सुंदर फुले उगवलेली असतात कास पठारागत. पाउस, धुके आणि पर्यटक तिन्ही कमी झालेल असतात असे तो सांगत होता. त्यात तिथल्या त्या प्रसिद्ध धबधब्यावर दारूडया लोकांची नुसती जत्रा पाहून माघारी फिरलो. परत येताना पुन्हा येष्टिने कणकवली, तिथून दुसर्या यष्टीने मडगाव तिथुन टेक्सिने गोवा विमानतल अणि विमानाने मुंबई असा गजब प्रवास केलय. ( विमान प्रवासाची मला फार भीती वाटते, त्यामुळ कधीच त्यात बसलो न्हव्तो, अणि बायको मला याच कारणावरून चिडवायची. गोवा मुंबई हा फ़क्त ५५ मिनिटांचा प्रवास अणि ५५ मिनिटे ही अशीच निघून जातील, शिवाय तिकिटदेखील कमी, अणि आमच्या पोरीला जावयाने विमानात बसून फिरवले, असे जेव्हा सासरची लोंक गावात बोम्ब ठोकतील तेव्हा त्यांना किती भरून आल्यागत होइल आणि आपली कोलर अजुन टाईट होइल ,याच सर्व गोष्टींचा विचार करुण " हे विमानात बसायला घाबरतात " या आपल्या माथ्यावरील लांछन पुसण्याच्या संधीचा फायदा करुण घेण्याचा निर्णय घेतला होता. विमानात चढताच पुन्हा कधीच बसणार नाही अशी माँ कसम खाऊन टाकली. पण हाय रे किस्मत.
४ महिन्याने कंपनीच्या एका अतिमहत्वाच्या कामासाठी विमानानेच दिल्लीला जाण्याची वेळ आली. भीती नष्ट व्हावी म्हणून खिडकीची तिकिट काढली होती, पण उदार मनाने ती एका बाईला दिली. नवरा अणि मुलगा एका बाजूला अणि ही दुसरीकडे असे काहीतरी झाले होते. मला सिट मिळाली आयिल. दोघांच्या मधेच. आजुबाजुच्या २ देव माणसानी मला पूर्ण वेळ धीर दिला.अणि माझी समजूत घातली.दिल्लीला उतरताच परतीची विमान तिकिटे रद्द करुण ऑगस्ट क्रांतीची केली. घरी आल्यावर बायकोने विचारले तेव्हा " मी का्य घाबरलो नैय का्य.." असे खोटेच परंतु आत्मविश्वासाने सांगितले. नवरा माझा एकटाच न घाबरता विमानात बसून आला याचे किती कौतुक वाटले होते बायकोला.
असो...
लोणावला किंवा महाबलेश्वर असे काही अजुन झाले नाहीये अंबाघाटाचे असे तरी सध्या दिसतेय . तिथे अजुन सो क्वाल्ड मार्केट देखील नाहीये . महाबलेश्वर एवढे मोठ नसले तरी २ दिवस शांत पडून राहता येइल अशी निसर्गसंपन्न जागा वाटतीये.
इथे मोजकीच होटल्स आहेत अणि ती सुद्धा प्रशस्त आणि बरीच स्वस्त. एक छोटे धरण जिथे पोहोण्याची परवानगी आहे, एक धबधबा आहे, शिवाय जंगल सफारी अणि पावनखिंड देखील..
एक होटेलची वेबसाईट पहिली, ज्या पद्धतीने अंबा घाट अणि होटेलची वैशिष्ट्ये सांगितले आहेत ते वाचून एकदा तिथे जावेच असे वाटू लागलय.
पावनखिंड होलीडे रिसोर्ट.
या होटेलचा मालक हा नक्कीच पुणेकर आहे असा दाट संशय येतोय. कारण त्याने बऱ्याच ठिकाणी धमकीवजा सुचना केलेल्या दिसत आहेत. अणि यावेळी मात्र स्वतःची गाडी घेउन जाण्याचा विचार आहे.
तर आपल्यापैकी जर कुणी अंबा घाटची सहल पूर्वी केली असल्यास सुचना अणि मार्गदर्शन करावे.
वाचने
11247
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अम्बा रिसॉर्ट नावाचे हॉटेल
http://misalpav.com/node
विमानप्रवासाची झलक आवडली.
अंबाघाट
मागच्या वर्षीपासून रात्रीची
In reply to अंबाघाट by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to मागच्या वर्षीपासून रात्रीची by प्रचेतस
पावनखिंड होलीडे रिसोर्ट ला
+1
In reply to पावनखिंड होलीडे रिसोर्ट ला by स्मिता श्रीपाद
बर्कि चा धबधबा
सूचना आणि प्रतिक्रिया बद्दल
आंबा घाट
मार्लेश्वरला ३ वेळा जाऊन आलो
In reply to आंबा घाट by Ramesh Kamble
पावनखिंड रिसॉर्टला नक्कीच
पावनखिंड रिसोर्ट खुप अगोदरच