एका माणसाची गोष्ट
चिक्या आबा आपली टोकराची लांब काठी टेकत सरकंवरून जाऊ लागला की गावातील उसाट पोरे घरात लपून 'चिक्या, ये चिक्या' असे ओरडायला लागत. म्हाताऱ्याला चिडवून त्याची टिंगल करून त्याच्या शिव्या आइकने हा या उसाट पोरांचा खेळच. चिक्या आबाही मग वयतागून "तुझ्या आयला मी xxx" अशा शिव्या देत दात-ओठ खात तणतणत निघून जायचा.
अंगात मलकट कफनी, खाकी रंगाची हाफ पँट, डोक्यावर गांधी टोपी, खाकेत शबनम बॅग असा चिक्या आबाचा एकूण पेहराव. केसांची पार अनारकली झालेली. तोंडात हिरड्याच शिल्लक राहिलेल्या.विंचवाचं बिऱ्हाड
(प्रयोगासाठी लेखकाची पूर्वपरवानगी आवश्यक आणि डी आर एम नंबर आवश्यक.)
१.
(रंगमंचावर एका उंच ठिकाणी एक मध्यमवर्गीय माणूस - वय अंदाजे ३५ - उभा आहे. तो काहीतरी विचार करतोय आणि त्याचा विचार पक्का झाल्यावर तो उंच ठिकाणावरून उडी मारतो. त्याच वेळी त्याची बायको घरात दचकून जागी होते.)
बायको :- ( घाबरून ) अहो.........
मुलगी :- काय झालं आई? .......
२.
(घरमालकाचा मुलगा घरात बसला आहे. ज्या माणसाने उंच ठिकाणावरून उडी मारली, तो विंगेमधून प्रवेश करतो. हातात एक नोटिस.)
घरमालक :- वाचली नोटिस?सतीश पिंपळे - एक ऋषिरंग
३१ डिसेंबरचा दिवस होता. आम्ही सगळे न्यू इयर सेलिब्रेशनच्या तयारीत होतो. खाण्याचा एखादा मस्त बेत आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसणं असा नेहमीचा प्लॅन. आज आमच्याकडे एक चित्रकार येणार होते. आजवर मी आमच्या घरी खूप लेखक, कवी मंडळी आलेली पाहिली होती, पण एका चित्रकाराला पहिल्यांदाच पाहणार होते. मला चित्रं काढण्याचं फार वेड, त्यामुळे मी फार खूश होते. वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.मध्ये पाहून चित्रकारांविषयी काही कल्पना तयार झालेल्या होत्या - लांब केस, दाढी, झब्बा असं काहीतरी...पाटील मालक
पाटील मालक.
".....या माणसाने एकही सल्ला न देता किंवा एका पैशाचीही मदत न करता मला अनेक गोष्टी शिकवल्या !" असे मी एखाद्याविषयी म्हणालो तर नक्कीच विचारात पडाल की याने नक्की काय केले असेल?
..विचारलं तर मलाही नीट सांगता येणार नाही, पण ओळख झाल्यापासून अवघ्या एक-दीड वर्षांतच या व्यक्तीने कांहीही न बोलता माझ्यावर प्रचंड प्रभाव टाकला.. आणि आज ओळख होऊन बारा तेरा वर्षे सहज झाली असावीत. आजही तो प्रभाव कमी झाला नाहीये.
त्या दिवसात मी कॉलेज करून पार्ट टाईम जॉब करत असे.जीना यहाँ, मरना यहाँ...
एक टिपिकल सकाळ. डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतंय. आपल्याला उठवत नाहीये, पण नाइलाज आहे. कसंबसं उठून, अर्धवट झोपेत ब्रश सुरू झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भूले बिसरे गीत' सुरू झालंय. लता गातेय - कधी 'राजा की आएगी बरात...', तर कधी 'बरसात मे हमसे मिले तुम...'. सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि खासकरून सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातलं हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासून सुरू झालेला रेडिओ हा रात्री छायागीत, बेला के फूल ऐकूनच बंद व्हायचा.La Ruta del Cares
अटलांटिक महासागराला पायाशी घेऊन उभा असणारा उत्तर स्पेन! लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरच्या खर्याखुर्या पाऊलखुणा इथे पाहायला मिळतात, तशीच पस्तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी मानवाने रंगवलेली गुफाचित्रंही. पण सोळाव्या शतकात अमेरिका खंडाहून युरोपला परतणार्या खलाश्यांसाठी या भागाचं वेगळंच महत्त्व होतं. जिवावर उदार होऊन केलेल्या सागरसफरीनंतर युरोपच्या भूमीचं प्रथमदर्शन त्यांना होत असे उत्तर स्पेनच्या एका पर्वतरांगेमुळे.हातोळे

हातोळे
बदलापुरात अनंत हलवायाकडे श्रीखंड घेताना एकदा हा पदार्थ दिसला होता. खायला अगदी चविष्ट वाटला. खाताना, त्यात काय काय असावे याचा अंदाज घेत केलेली ही पाकृ.
साहित्यः
मिसळपाव