Skip to main content

रुद्राध्याय एक मनन.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 24/10/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
रुद्राध्याय ह्या प्रसिद्ध सूक्ताचे नाव बहुतेकांनी ऐकलेले असते कारण शिवभक्तांचे ते एक नेहमी आवर्तन केले जाणारे सूक्त आहे. मी स्वत: जरी शिवभक्त - किंबहुना कोणत्याच देवाचा भक्त - नसलो तरी ह्या सूक्ताचे स्वच्छ उच्चारांमध्ये आणि आघातांसह केले जाणारे पठन मला ऐकायला फार आवडते. (जालावर अनेक ठिकाणी हे ऐकायला सापडते. त्यासाठी माझे आवडते संस्थळ हे आहे. हे पठन प्रामुख्याने ’नमक’ आणि ’चमक’ अशा दोन भागांमध्ये विभागले आहे. नमकामध्ये ’नम:’ ह्या शब्दाच्या आणि चमकामध्ये ’च मे’ ह्या शब्दांच्या वारंवार आणि लयबद्ध पुनरावृत्तीमुळे ही सुश्राव्यता निर्माण होते.

हॅरी पॉटर - भाग दोन

लेखक nishapari यांनी मंगळवार, 24/10/2017 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ हॅरी पॉटरच्या जगातले जादुई प्राणी या जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जादुई प्राणी / जादुई जीव आहेत . त्यातले कथेच्या दृष्टीने महत्वाचे आणि विविधतेची साधारण कल्पना येईल असे काही पुढीलप्रमाणे - १ . हाऊस एल्फ्स - हाऊस एल्फ हे अतिशय जुन्या व श्रीमंत प्युअर ब्लड जादूगार घराण्यांमध्येच आढळून येतात . हाऊस एल्फची उंची साधारण 3 फूट असते . हाऊस एल्फ हे आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यास जादूने बद्ध असतात . मालकाची कोणतीही आज्ञा ते मोडू शकत नाहीत .

शिवार

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 23/10/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्या रानाच्या कुशीतून शिवार मोहरले उभ्या शेतात निळे आभाळपक्षी उतरले राईराईत सूर्यदूतांचा पदर उलगडला झाडाझाडातून कोवळा गंध ठिबकला भिरभिरणाऱ्या ऊन्हाची झुळूक भवताली नाचली बहरलेल्या फांदीवरील पालवी हळूच कुजबुजली तांबड्या पायवाटेने दूर गवतात पाय पसरले वाऱ्याचे रुपेरी सूर पानात रुमझुमले बाभळीच्या हिरवट सावल्या पिकात सांडल्या दाण्यादाण्यात रानपाखरांच्या चोची बुडाल्या रंग पिकल्या झुडुपाचा बांधावरती देह झुकला चहुकडे हिरव्या नक्षत्रांचा मळा फुलला
काव्यरस

गोलमाल अगेन

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 23/10/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथितयश दिग्दर्शक रोहित शेट्टी "गोलमाल" सिरीज मधल्या या चौथ्या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत. गोलमाल सिरीज मधील आधीचे तीनही चित्रपट म्हणजे "डोके घरी ठेवा आणि फक्त performances आणि दिग्दर्शन बघा" असा सरळ सरळ हिशेब होता. हा चौथाही त्याला कसा अपवाद राहील ??? गोलमाल सिरीज म्हणजे निर्बुद्ध कथा अन कथानक चांगलं दिग्दर्शन असेल तर तिकीटबारीवर चित्रपट कसा कमाल करू शकतात याचे एक निर्विवाद उदाहरण. कथा हि असते पण जेवताना लोणचं जस असते "तोंडी लावण्यापुरतं" तितक्याच महत्वाची. कथा येथेही आहे, छान भूत वगैरे सुद्धा आहे पण चित्रपट कोठेही भीतीदायक नाही उलट विनोदी आहे.

माणसातील तील निसर्ग जागा होईल का कधी?

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 23/10/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.

हे सव्यसाची,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 23/10/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
खुणावतील तुला जटिल गणिते- विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची हाकारतील तुला कोडी- * विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या विश्वाच्या अटळ अंताची# या अपार भूतभविष्यादरम्यान लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका कुठे खिळवलाय, हे सव्यसाची? तो इथेय बघ, निळ्या पाखरपंखावर अथक थिरकणार्‍या क्षणभंगूर वर्तमानात (*entropic end of the universe#)
काव्यरस

ती.

लेखक बोलघेवडा यांनी सोमवार, 23/10/2017 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
ती गेली. अगदी नक्की. ऑफिसची बॅग उचलताना खात्रीच पटलीये तशी. पण मन मात्र अजूनही तिच्याच आठवणीत रमलय. ऊन ऊन गरम पाण्याने आंघोळ करून, नवीन कपडे घालून, मुलाबरोबर फटाके उडवायला सोकावलेल्या मनाला आता ऑफिस नावाच्या चौकोनी खोक्यात नाईलाजाने कोंबावं लागेल. जिभेवर अजूनही फराळाची चव रेंगाळतीय. तिला ऑफिस मध्ये जाऊन पोळी भाजीचा डबा खायची सवय करायला थोडा वेळ द्यावा लागेल. आकाशकंदील, पणत्यांतून झिरपणारा तो पिवळा प्रकाश आता भकास ट्युबलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात विरघळून जाईल. मुलांत मुल होऊन सजवलेली ती किल्ल्याची मोरपंखी दुनिया आता नुसतीच मातीची ढेकळं बनून जाईल.

कंपन, अनुनाद आणि दुर्घटना

लेखक अमितदादा यांनी रविवार, 22/10/2017 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा मोजमापे, युनिट आणि दुर्घटना
टीप      १. लेखात अनेक ठिकाणी क्लिष्टता टाळण्यासाठी सरलीकरण (simplification) केलेलं आहे, काही ठिकाणी इंग्रजी शब्द जाणीवपूर्वक तसेच ठेवले आहेत.      २. लेखाच्या नावात जरी दुर्घटना हा शब्द असला तरी काही लिहिलेल्या घटना ह्या संभाव्य दुर्घटना होत्या, ज्या सुदैवाने टळल्या.

हॅरी पॉटर

लेखक nishapari यांनी रविवार, 22/10/2017 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी पॉटर ज्यांना मुळात वाचन या प्रकाराचीच ऍलर्जी आहे अशांचा काही प्रश्नच नाही . पण अनेक वाचनप्रेमी मराठी लोक हॅरी पॉटर म्हणजे लहान मुलांची पुस्तकं किंवा काय ती जादू आणि छड्या बिड्या .. हे काय वय आहे का परीकथा वाचायचं .... लहान होतो तेव्हा वाचलं कि अल्लादिन आणि जादूचा दिवा वगैरे ... आता त्यात इंटरेस्ट वाटणं शक्य नाही असं म्हणतात आणि हॅरी पॉटरच्या वाटेलाच जात नाहीत . तर काहीजण हॅरी पॉटरचे चित्रपट पाहतात (क्वचित कुतूहल म्हणून किंवा बहुधा मुलांच्या आग्रहाखातर ) आणि त्यांचा त्यातला रस संपतो . " माहीत आहे स्टोरीलाईन मला ; एवढी काही खास नाही !

नो रिग्रेट्स

लेखक Anand More यांनी रविवार, 22/10/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात. मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं २०१० मध्ये. म्हणजे हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ५१ वर्षांनी. क्रिस्तोफर नोलानच्या इन्सेप्शन चित्रपटात हे गाणं वारंवार येतं. इतकंच काय पण संपूर्ण चित्रपटात हेच गाणं पार्श्वसंगीत म्हणून संथ लयीत वाजत रहातं. बॅटमॅन आणि जोकरमुळे नोलानचा फॅन बनलेल्या मला इन्सेप्शनमध्ये मात्र फसगत झाल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर बांधलेला हा चित्रपट जरी मला आवडला असला तरी यात प्रेक्षक कसा विचार करतील त्याची गणितं मांडून पटकथेची मांडणी केल्यासारखी मला वाटली होती. हे काही वाईट नाही.