Skip to main content

ग्राम"पंचायत" लागली..!! -4

लेखक विशुमित यांनी बुधवार, 18/10/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40963 http://www.misalpav.com/node/41040 http://www.misalpav.com/node/41296 'शांती'मामा ने मला आवाज दिला, " भाच्याबा, चला मिटिंगला." "कुठे आहे मिटिंग?", मला अचूक अंदाज आला होता. "मारुतीच्या देवळासमोर". माझा अंदाज खरा ठरला होता.

मश्रुम फ्राय

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 18/10/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मश्रुम फ्राय साहित्य: १ मश्रुमचा चौकोनी पुडा (फूडबझार, स्टार, मोअर मॉल मध्ये मिळतो तो) (धुवून निथळून हलक्या हाताने कापडावर कोरडा करून कापावा ) ९ लाल ब्याडगी मिर्च्या (छोट्या कुकरमध्ये, उगा अंगभर पाण्यात १ शिट्टी घेऊन शिजवून, बिया देठं बाजूला काढून, साल मगज निथळून ठेवावे ) १ टी स्पून काळी मिरी १/२ टेबल स्पून आलं + १/२ टेबल स्पून लसूण १ टी स्पून फिश सॉस / ऑयस्टर पेस्ट १ टी स्पून व्हाईट व्हिनेगर १ टी स्पून साखर उगाच थोडं मीठ १ चक्री फुल (थोडा टवका खाऊन खात्री करा चक्री फुल कडू नसेल याची ) १ टेस्पून तेल (तीळ तेल किंवा कुठलंही प्रकारचं न्यूट्रल तेल वापरू शकता ) तीळ गार्निशसाठी =======

दिवाळी कविता

लेखक वैभवदातार यांनी बुधवार, 18/10/2017 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता 'सुसंगती सदा घडो सुजाण वाक्य कानी पडो ' ह्या कवितेच्या चालीवर म्हणता येते. दीपावली आजि असे घरोघरी दिवे लागले कंदील पणती माळा तयांचे तेज हे फाकले ||१ || धनत्रयोदशी धन्वंतरी पूजा महत्त्व कळे आयुर्वेदाचा देव हा आयुष्य आपणासी मिळे ||२ || नरकासुरासी संहारी श्रीक्रुष्ण जनांसी तारी दुष्टांचा मारक हरी सुजनतारक श्रीहरी ||३ || प्रभातकाळी उठुनिया लावू सर्वांगासी चंदन अभ्यंग स्नान करूसुगंधीउटणे तैल लेवून || ४ || लक्श्मीपूजा असे घरी धनवर्षा होऊ दे दारी हिशेब जुन्या चोपड्या तयांचे पूजन मी करी ||५ || प्रतिपदाबली पाताळी डोई वामन चरण विक्रम समवत्सर होई नववर्ष तू जाण ||६ || दिवाळी फ

दृकश्राव्य विभाग :- मार्टिन पुणेकर पाटील

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 कधी कधी मिपासाठी काम करताना "याच साठी केला होता अट्टाहास" असं वाटतं. मार्टिनशी ओळख ही त्याच प्रवासाची सुरूवात. मार्टीन हा आपल्या कौशिक लेलेंचा शिष्य. वेल्लाने त्याचा युट्युबवर एक व्हिडीओ पाहुन आपल्या अंकासाठी काही बोलण्याची गळ घातली. तो सुद्धा उत्साही माणूस निघाला आणि त्याने लगेच होकारही दिला. होकार तर दिला पण पहिले आठ पंधरा दिवस काहीच हालचाल नाही. आम्ही आपले मध्येच त्याला हलवून यायचो. देतोय देतोय.. काही तरी काम करतोय.. असं म्हणत म्हणत अंक आठवड्यावर आला. अजून काहीच हाती आले नव्हते.

दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - जस्टिस चौधरी

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

लेखक :- आदिजोशी

अभिवाचन :- चिन्मय शिंत्रे

पार्श्वसंगीत ऊर्फ ढींच्याकीकरण :- वेल्लाभट

एक उनाड दिवस..

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 एगरकिंगनच्या फॅक्टरीमध्ये दिनेशची व्हिजिट होती. तो गाडीने जाणार हे ठरल्यावर मीही त्याच्याबरोबर जायचं ठरवलं. ए ५वरून आमची गाडी बासेलच्या दिशेने पळू लागली. कार्ल्सरुह मागे पडलं, आता स्ट्रासबुर्गकडे जाणारा रस्ता दिसू लागला. ए५ वरूनच पुढे जात फ्रायबुर्ग ओलांडून आम्ही बासेलकडे कूच केलं. मध्येच एकदा आमच्या आणि गाडीच्या टाक्या भरल्या. जरी ही काही माझी पहिली स्विस ट्रिप नव्हती, तरीही तिकडे जायचं असलं की वेगळाच उत्साह मनात असतो. त्यातून अनवट ठिकाणी जायचं असलं की बघायलाच नको..

दौलत की चाट

लेखक जुइ यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी दिल्ली नावाचे एक महानगर होते. तेथे दौलत नावाचा एक व्यापारी राहत होता. हिवाळ्यात त्याचा एक नेम होता. नेमाला तो काय करी? तर म्हशीचे घट्ट दूध घेई. त्याबरोबर मलई घेऊन ते एका मोठ्या मातीच्या भांड्यात एकत्र करी. मग ते भांडे झाकून रात्री बाहेर ठेवी. त्यावर बर्फाची लादी ठेवी. (अर्धा लीटर होल मिल्क(तुम्ही म्हशीचे दूध वापरू शकता), अर्धा ते पाऊण कप हेवी क्रीम.