Skip to main content

उनाडटप्पू

लेखक चॅट्सवूड यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
"उभ्या लाइफमध्ये काहीतरी आडवं केलं पाहिजे" असं म्हणून लौकिक खाली बसला. त्याने त्याची निळ्या रंगाची, उजव्या पायातील स्लीपर हातात घेतली. स्लीपरचा बंद बाहेर आला होता, तो जागच्या जागी बसवू लागला. "भावा... मर्दा.... करू या काहीतरी" लौकिकच्या खांद्यावर हात ठेवत प्रतीक म्हणाला. लौकिक आणि प्रतीक नेहमीसारखे 'विपुल की चाय' टपरीवर चहा घेत होते. हा त्यांचा नेहमीचा कट्टा होता. प्रतिक आणि लौकिक... दिसायला तसे साधारण, वागण्यात असाधारण. जीवनाबद्दल काहीच धोरण त्यांच्याकडे नव्हते.

हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा

लेखक मार्गी यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
. एखाद्या माणसामध्ये जिद्द असेल, हिंमत असेल, तळमळ असेल तर नियती त्याला कुठून कुठे नेते, ह्याचे अतिशय तेजस्वी उदाहरण म्हणजे हेईनरिश हारर! स्वामी विवेकानंदांनी निर्भयता हा गुण धार्मिकतेचा मुख्य सद्गुण सांगितला गेला आहे. कशालाही आणि मृत्यूलाही न घाबरणारा माणूसच खर्‍या अर्थाने धार्मिक असतो.

दृकश्राव्य विभाग : आगळी वेगळी दिवाळी! (दिवाळी फोटो)

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 नमस्कार मिपाकरहो, दृकश्राव्य विभागाच्या आवाहनाच्या वेळेस जेव्हा दिवाळीच्या फोटोंचे आवाहन केले, तेव्हा असे वाटत होते की मिपासारख्या प्रचंड वाचकवर्ग असलेल्या संस्थळावर केवळ फराळ आणि पणत्यांचे फोटो असू नयेत. ह्या विभागात काय वेगळे करता येईल ह्याचा विचार करत असताना दिवाळीशी निगडीत अनेक कल्पना समोर आल्या. पण सरते शेवटी आपण ह्या संधीचा वापर उत्तम काम करणार्‍या संस्थांची माहिती देऊन केला पाहिजे ह्यावरच टीमचे एकमत झाले.

कोलाज

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी नव्वदीच्या सुरूवातीला दूरदर्शनवर 'नुक्कड' नावाची हिंदी मालिका लागायची. बहुरंगी आणि बहुढंगी असलेली पात्रं आणि त्यांच्या रोजच्या जगण्याभोवती गुंफलेली कथा यामुळे नुक्कड मालिका लहानपणी आवर्जून पाहायचो. आता पटकन डोळ्यासमोर येणारी नावं म्हणजे गुरू, गणपत हवालदार, अट्टल दारूड्या असलेला खोपडी, कादरभाई, तो पानवाला, ही आणि यातली सगळी पात्रं या मालिकेच्या निमित्ताने माझ्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली होती.

दृकश्राव्य विभाग :- पाककृती - लवंगलतिका

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

मिपाची सुगरण इशा दरवेळेस आपल्यासाठी नव नवे पदार्थ घेऊन येत असते. यंदा ती घेऊन आली आहे एक बंगाली पारंपारीक पाककृती : लवंगलतिका !!
Footer

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
. मोनालिसा हे जगातले सर्वाधिक प्रसिद्ध चित्र. अगदी एका दिवसासाठी पॅरिसला येणारेसुद्धा ते बघण्याचा आटापिटा करतात.

गाणे

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 21/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
गाणे ओलांडून कितीकदा प्रकटले मी या जगाच्या मिती येतानाच कळेल काय इथला मुक्काम माझा किती? श्वासांची गणिते करून क्षणही जन्मांतरी मोजले केव्हा या घरट्यामधून उडणे भाळी असे कोरले? 'आता येथुन एक पाउल पुढे आहे तुला जायचे त्या ठायीच तुझे नवे घर असे, तेथेच थांबायचे' कोणी सांगत राहते हर क्षणी कानी असे काहिसे जाते मोजत पाउले किति तरी मुक्काम तो ना दिसे पाकोळी घुमटात एकटी झुरे देहात आत्मा तसा इच्छेवाचुन देहही वसतसे कोणी दिलेला वसा होते निर्मम चित्त मात्र सुटका सोपी कुठे एवढी? मुक्तीची अडवून वाट बसली दारी भु