Skip to main content

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 14/06/2025 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

लेखक माहितगार यांनी शनिवार, 14/06/2025 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

"रुद्रावतारी" न्यायाधीश

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 13/06/2025 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच... मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात. त्यांच्या पुढील मुलाखतीत ते म्हणतात, कोर्टात दाव्यांचा महास्फोट झाला आहे. हे एक प्रकारे चांगलेच आहे. कोर्टातल्या दाव्यांची संख्या आणखी वाढायला हवी.

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

लेखक गवि यांनी गुरुवार, 12/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.

चा-वट पॉर्निमा!

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 11/06/2025 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे बोलणे खरे करते ती असे नखरे करते पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण जेवण सुद्धा बरे करते राग नक्की झूठ असावा प्रेम बहुदा खरे करते मिठी मध्ये घेते आणिक हट्ट सारे पुरे करते

महाजनस्य संसर्गः

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 10/06/2025 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
महाजनस्य संसर्गः -राजीव उपाध्ये पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ. अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो, की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ संस्कृतीच्या चालीरीती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात; आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे आहे.

साहित्य, ललिता आणि "समोरच्या फ्लॅट मधल्या dog feeder बाई"

लेखक kvponkshe यांनी मंगळवार, 10/06/2025 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य तेव्हा जॉब करत होता, आणि ललिता सध्या फ्री लान्सिंग. त्यांची मुलगी लेखना आता ५ वर्षांची झाली होती. सध्या ती एका शाळेत सिनियर के जी मध्ये होती. एका उच्चभ्रू सोसायटीतील स्वतःच्या फ्लॅट मध्ये ते राहत होते. त्यांच्या फ्लॅटच्या लॉबीच्या समोरचा फ्लॅट नुकताच विकला गेला होता. पण अजून कोणी तेथे राहायला आले नव्हते. त्या फ्लॅटच्या जुन्या मालकांचे आणि साहित्य ललिता यांचे चांगले संबंध होते. आता कोण तिथे नवीन येणार याची साहित्य आणि ललिताला उत्सुकता होती. त्यांच्या सोसायटीच्या एंट्रन्स गेट च्या बाहेर बरीचशी कुत्री होती.

शाळेचा पहिला दिवस...

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 10/06/2025 07:35 या दिवशी प्रकाशित केले.

उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले. कुणी घराकडे तर कुणी जाॅगर ट्रॅक कडे वळाले.

न्यायाधीश 'कॅश'वंत वर्मा...

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 09/06/2025 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
घ्या कविता... 'कॅश'वंत वर्मा, भोग आता कर्मा, महाभियोगधर्मा सामोरी जा || जर दिला राजीनामा, तर नाही काजीनामा, सांग तुझा कारनामा, निवृत्ती जा || न्यायाधीशाच्या घरी रोकड, आता तो शोधतो बोकड, जो घेईल खांद्यावर जोखड, वाचवण्या || संसदेत घेराव, मांडला ठराव, तरी हे राव, ढिम्म नाही || न्यायाधीश यशवंत पकडला गेला 'कॅश'वंत आता करणार बस वंत घरातच ||