विसराळू नाना
विसराळू .. वा काय शब्द आहे ना,
याचे किस्से पण खूप आहेत बर तर असेच काही किस्से इथे सांगतो..........
आमच्या गावचे नाना म्हणजे एक नंबर विसराळू माणूस.
बाजारात गेला तर मोकळी पिशवी घरी आणि बायको बाजारात एवढा विसराळू.
बरं असं पण नाही की हा काम करत नाही. चांगला साखर कारखान्यात कामाला आहे, पण कसल हो! कामावर जाताना डबा घेऊन बस थांब्यावर आला तर जेवणाचा डबा हलवून लक्षात ठेवतो, कामावरून आलो आहे की जायचं आहे ते; आणि हो, कारखान्याकडे जाणा-या आणि येणाऱ्या दोन्ही गाड्यांना हात करतात.
मिसळपाव
दोनच महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना मन सुन्न झाले. केवळ नापिकी हे एकमेव कारण शेतकर्यांच्या आत्महत्यांमागे नाही हेही प्रकर्षाने जाणवले.