Skip to main content

पावणेदोन महिन्यांत ३४ टक्के! :)

Published on 11/12/2007 - 17:41 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, साधारण पावणेदोन महिन्यांपूर्वी आम्ही खालील समभाग सुचवले होते - 1) ABC Bearings (89 - 92) - ९० ला मिळत होता. 2) Canfin Home ( 55-58) - ५५ ला मिळत होता. 3) Omax Auto ( 58 -63 ) - ५९ ला मिळत होता. 4) City Union Bank ( 208 - 211) - २०९ ला मिळत होता. 5) First Leasing ( 45 - 47) - ४५ ला मिळत होता. 6) Deccan Cement ( 225 - 228) - २१८ ला मिळत होता. 7) Deepak Nitrate ( 100 - 105) १०० ला मिळत होता. 8) Savita Chemicals ( 260 - 266) २६३ ला मिळत होता. 9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!!

याद्या 16836

फुकटेगिरी

Published on 11/12/2007 - 15:04 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार लोकहो !! आज एक नवीन विषयाला सुरूवात करीत आहोत. विषय सर्व मानवजातीच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे फुकटेगिरी. प्रत्येकाला फुकट मिळालेली गोष्ट आवडत असते. भय्याकडे अ़ख्खी पाणीपुरी खाल्ल्यावर त्याच्याकडून वर एका फुकट पुरीची अपेक्षा असते. गावाला स्वत:च्या बागेत आंब्यांची रास पडली असेल तरी च्या मायला त्या शेजार्‍याच्या झाडावर दगड भिरकवण्यासाठी आमचा हात अजूनही शिवशिवतो. हाच आम्ही जिवंत असल्याचा पुरावा. आता आम्ही कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे आमची फुकटेगिरी इतरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11189

नार्सिससच्या प्रतिबिंबाची लावणी

Published on 11/12/2007 - 08:59 प्रकाशित मुखपृष्ठ
मागे आजानुकर्ण यांनी नार्सिससची कथा सांगितली. इथे त्याच्या प्रतिबिंबाने म्हटलेली लावणी देत आहे. ("विडंबन" म्हणण्याइतके यात व्यंग्य नाही, आणि काव्य म्हणण्याइतपत प्रतिभा नाही, आता काय करावे...)
नार्सिसस नार्सिसस जवळि असा बसस तू न जर दिसस मी पण नाही... कोणता मम शिणगार? तू जो करी काही! त्या दिसा दिला तू ठिय्या करुनि मी हिय्या थिरक भुवयांत भुवयांत, लाल गालांत लाल ओठांत तू कशा ओळखिला खुणा सख्या सजणा लऊ हळुवार दे मुका मजला पेटविले अंगार! मी फार तुझा रे यार रंग आकार तुझाच!

याद्या 10845

कमळाबाई

Published on 10/12/2007 - 16:27 प्रकाशित मुखपृष्ठ

कर्नाटकची राणी व्हाया  हरखुन गेली कमळाबाई;
मुखात मारुन मटकन बसली हिरमुसलेली कमळाबाई !


पदर धरोनी हिचा जयांनी लुळा-पांगळा प्रवास केला--
'ठिकाण' येताच ते म्हणाले --भरकटलेली कमळाबाई


ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ?
परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई !


बाप-लेक ते बनेल कोल्हे काटा-छापा खेळुन गेले;
साधन म्हणुनी वापरली ही --खुळी 'अधेली' कमळाबाई


धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या
लेखनविषय:

याद्या 10099

आशा

Published on 10/12/2007 - 13:33 प्रकाशित मुखपृष्ठ
काही सुचत नाही काही टोचत नाही रस्त्यावरच्या छोट्या मुलीने विकलेली फुलं बोचायची मनाला सवय तरी होती दुसर्‍याचा विचार करायची पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही हल्ली मनाला फार काही टोचतही नाही जरडच झालोय मी, तुटल्यासारखा, जख्ख म्हातार्‍या वाळल्या खोडासारखा तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल. मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची. मला काही टोचत नाही, ही निर्लज्ज भावनाही संपुन जाईल एक दिवस कुणासाठी काही करण्याचे सुख घेवून येईल पण तोवर सत्य हेच... मी एक जरड जख्ख...
लेखनविषय:

याद्या 8674
Taxonomy upgrade extras

खाडा -विडंबन

Published on 10/12/2007 - 05:20 प्रकाशित मुखपृष्ठ
लोकहो ! आमची प्रेरणा 'बरेच दिवसांनी तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार( म्हणजे आम्ही) आणि इतर मित्र फार मागे लागले होते (!) म्हणून धोंडोपंतांनी केलेली सुंदर गझल अखाडा धोंडोपंत, आपण आज्ञा केलीत 'केश्या,आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं. झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो.
लेखनविषय:

याद्या 7331

म टा, "म", "मा", "मि" आणि "उ" - काही सैल विचार

Published on 09/12/2007 - 20:02 प्रकाशित मुखपृष्ठ
मटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. या निमित्ताने मटाच्या बदललेल्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अतिरंजीत दाव्याविषयी मनात आलेले काही सैल विचार (stray thoughts). बदललेले स्वरूप आमच्या घरी मटा येत असे. मटा वाचण्याची सवय बालपणापासूनच. त्यामुळे आजदेखील जालावर मटा वाचला जातोच पण तो केवळ एक सवय म्हणून. त्यात पूर्वीची मजा नाही. त्यावेळच्या छापील मटाचे स्वरूप आणि भाषा एखाद्या घरंदाज स्त्रीसारखी असे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 10533

अण्णा गायले!

Published on 09/12/2007 - 19:54 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, काही वैयक्तिक कारणांमुळे या वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावू शकलो नाही, परंतु आजच त्या महोत्सवाला हजेरी लावलेले आमचे पुण्यातील मित्र चित्तोबा यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यात आम्हाला एक अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची बातमी समजली! प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली ३ वर्ष गाऊ न शकलेले भारतीय अभिजात संगीताचे अध्वर्यु, पद्मविभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी या वर्षी या महोत्सवात आपली गानहजेरी लावून आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाईगंधर्व यांना स्वरांजली वाहिली! मंडळी, संगीतक्षेत्रातल्या मंडळींकरता यापरीस दुसरी आनंदाची बातमी ती काय असू शकते?
लेखनविषय:

याद्या 11393

अखाडा - गझल

Published on 09/12/2007 - 14:53 प्रकाशित मुखपृष्ठ
लोकहो ! बरेच दिवसांनी गझल लिहून झाली. तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार आणि इतर मित्र फार मागे लागले होते गझल लिही, गझल लिही. मला लिहिते करण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणून ही गझल या मित्रांना अर्पण. केश्या, आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं. झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो.
लेखनविषय:

याद्या 17934