Skip to main content

प्रकाश बजाज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुसखुशीत जाहीर पत्राचा परिचय!

Published on 23/11/2010 - 21:55 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रकाश बजाज यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुसखुशीत जाहीर पत्राचा परिचय! प्रकाश बजाज यांना कोण ओळखत नाहीं? मुंबई शिरकाणानंतर त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पहिल्या पत्राने ते स्वतः तर प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात तर आलेच पण त्यांनी "Word format" मध्ये लिहिलेल्या पत्राला खाली कुणीतरी जाणता-अजाणता ते टाइम्स ऑफ इंडिया चे सहसंपादक असल्याचे घुसवून दिले व त्यासाठी टाइम्सने त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरायची तयारी केली होती असे त्यांनीच मला सांगितले. त्यांना मी यापुढे pdf format मध्ये लिहीत जा असा सल्ला दिला तरीही हा पठ्ठ्या अजूनही Word format मध्येच लिहितो. आमची बर्‍यापैकी गट्टी जमली असून लवकरच आम्ही एकमेकांना भेटणार आहोत!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5429

प्राण्यांवर दया करा ?

Published on 23/11/2010 - 21:48 प्रकाशित मुखपृष्ठ
सकाळी वॉकला निघाल्यावर एक दॄष्य पहावयास मिळते. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान लहान बिस्किटे पडलेली आढळतात. जैन बांधव ज्या ठिकाणी जास्त आहेत, अशा ठिकाणी हे दॄष्य हमखास दिसते. मी अनेक लोकांना पुडीतील बिस्किटे कुत्र्यांसमोर टाकताना पाहिले आहे. ती बिस्किटे अशीच पडून राहतात, बहुतेक कुत्र्यांना ती आवडत नसावीत? मुक्या प्राण्यांवर दया दाखवण्याची ही पद्धत वाईट नाही. पण फक्त सकाळी त्यांच्या पुढ्यात ही विशिष्ट बिस्किटे टाकली की त्यानंतर कुत्रे ती बिस्किटे खातात की कचर्या त जातात हे या बांधवांपैकी कुणी पहात असेल, असे वाटत नाही. जैन बांधवांचे अनुकरण आपले काही मराठी बांधवही आजकाल करताना दिसतात.

याद्या 2405

वर्तूळ - एक अनुभव

Published on 23/11/2010 - 21:23 प्रकाशित मुखपृष्ठ
आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते.

याद्या 7108

दडपलेल्या पोह्यांची कहाणी..

Published on 23/11/2010 - 21:17 प्रकाशित मुखपृष्ठ
"आय वॉन्ट येल्लो पोहाज फॉर लंच इन माय टिफिन, दॅट्स ईट!" पिल्लू इरेला पेटलं होतं. का? तर त्याला डब्यात पोहे हवे होते. इतके दिवस, सकाळी ७.४५ ला केलेले कांदेपोहे/बटाटे पोहे दुपारी १२.२० ला हा खाईपर्यत ते नको इतके गार होणार आणि ते ही सध्याच्या थंडीच्या दिवसांत ते हडकून जातील , नो डाऊट! या विचाराने मी त्याला डब्यात पोहे देणे टाळत होते. पण गेल्या आठवड्यात शाळेतून घरी आल्या आल्या रणशिंग फुंकलं गेलं आणि पोह्यावरून आकाश पाताळ एक झालं! "आय वॉन्ट यल्लो पोहाज.. दॅट्स इट!" पिलू हेका सोडत नव्हत आणि मी उगाचच त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत होते..

याद्या 9586

खोल खोल खोली !

Published on 23/11/2010 - 21:03 प्रकाशित मुखपृष्ठ
सहज एके दिवशी माझ्या कार्यलयातिल सहकार्र्याशी त्याच्या नवीन घराबद्दल बोलत असताना मी त्याला म्हटले, "आतल्या खोलीत कोण राहणार मग?".. तर माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजि तो जोरात केकाटलाच! "ई..ई.. खोली काय?" मला समजेचना कि हा का ओरडला ते! मी त्याला कारण विचारले असता तो मला म्हणाला , " खोली हा शब्द मराठित फक्त पाण्याची खोली किंवा तत्सम संदर्भात वापरतात. घराच्या संदर्भात नाहि वापरत! " मग नक्कि खरे काय किंवा खोटे काय हे कळेच ना! म्हणुनच यावर जाणकरांची कय मते आहेत, हे जाणुन घेण्यासाठी हा धागा सुरु केला आहे! तरी आपण त्यावर थोडा प्रकाश फेकुन मारावा हि विनंती . ;)

याद्या 6498

पंतप्रधानांना लिहिलेले पत्र

Published on 23/11/2010 - 18:48 प्रकाशित मुखपृष्ठ
मी आज प्रथमच लेखन करत आहे तरी काही चुक्ले तर माफ करा. मी काही दिवसांपुरवी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले होते. पत्र टेंभली गावातिल सुविधांबद्द्ल होते. अधिक माहिती खालिल दुव्यावर मिळु शकेल. http://www.loksatta.com/lokprabha/20101126/cover.htm पत्र जसेच्च्या तसे देत आहे. Dear Sir, I am Nikhil Surendra Hadke from Pune.

याद्या 3718

शिक्षणाची किंमत

Published on 23/11/2010 - 17:51 प्रकाशित मुखपृष्ठ
''ए, कँटिनमधून चहा आणा रे कोणी तरी! '' दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते! एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो! समोर कॉलेजची नवी इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिच्या जागी असणाऱ्या आधीच्या जुन्या खुणा पार बुजून गेलेल्या.
लेखनप्रकार

याद्या 3721

आई ... मिटलेला श्वास.. ९

Published on 23/11/2010 - 17:32 प्रकाशित मुखपृष्ठ
भाग ८ :- http://www.misalpav.com/node/15526 सांजवेळ का ती अशीच सरुन गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली आकाशी उधळूनी रंग केली प्रतारणा किरणांनी ढळत्या सूर्याची साक्ष आज मावळून आस गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| चांदण्यांच्या प्रकाशात चंद्रकोर हरवून गेली नयनांच्या कोरीव बांधावर आज आसवे न्हावून गेली वार्‍याच्या मंद झोतात गवताची पाती हलली आशेच्या पोकळ मेघातून आज स्वप्ने बरसून गेली माझ्या मनात तू पुन्हा विरघळून गेली ||२|| - शब्दमेघ
लेखनविषय:

याद्या 1114
काव्यरस

परदेशी गेलेल्या मुलास ......./

Published on 23/11/2010 - 16:16 प्रकाशित मुखपृष्ठ
किती वर्षे झाली तू गेला आहेस आता तुझे वय देखील वाढले नाही का ..? तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो आणि तू तर अगदी मस्त होतास आता बरीच वर्ष होऊन गेली बघ अन मी तर आता खूप थकून गेलोय रे कसे वय वाढते माणसाचे ? कळत नाही बघ..!! आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा तू बोलावतोयस खरा पण पायच निघत नाही बघ .. ह्या मातीतून ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे आताआताशी ..... आपण बघतोयना एकमेकांना काम्प्युटरवर तेव्हा किती वाटतो आपण जवळ आपण बोलतो किती मनमोकळे .... खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद
लेखनविषय:

याद्या 1823
काव्यरस

परदेशी गेलेल्या मुलास ......./

Published on 23/11/2010 - 16:15 प्रकाशित मुखपृष्ठ
किती वर्षे झाली तू गेला आहेस आता तुझे वय देखील वाढले नाही का ..? तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो आणि तू तर अगदी मस्त होतास आता बरीच वर्ष होऊन गेली बघ अन मी तर आता खूप थकून गेलोय रे कसे वय वाढते माणसाचे ? कळत नाही बघ..!! आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा तू बोलावतोयस खरा पण पायच निघत नाही बघ .. ह्या मातीतून ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे आताआताशी ..... आपण बघतोयना एकमेकांना काम्प्युटरवर तेव्हा किती वाटतो आपण जवळ आपण बोलतो किती मनमोकळे .... खूप छान वाटते बघ कितीवेळा तू स्वप्नात येतोस अगदी शाळेतल्या वयाचा असतो तुझ्या हातात कसला कप आणि फुललेला चेहरा मला अजूनही आनंद
लेखनविषय:

याद्या 966
काव्यरस