आई ... मिटलेला श्वास.. ९
भाग ८ :- http://www.misalpav.com/node/15526
सांजवेळ का ती
अशीच सरुन गेली
माझ्या मनात तू
पुन्हा विरघळून गेली
आकाशी उधळूनी रंग
केली प्रतारणा किरणांनी
ढळत्या सूर्याची साक्ष
आज मावळून आस गेली
माझ्या मनात तू
पुन्हा विरघळून गेली ||२||
चांदण्यांच्या प्रकाशात
चंद्रकोर हरवून गेली
नयनांच्या कोरीव बांधावर
आज आसवे न्हावून गेली
वार्याच्या मंद झोतात
गवताची पाती हलली
आशेच्या पोकळ मेघातून
आज स्वप्ने बरसून गेली
माझ्या मनात तू
पुन्हा विरघळून गेली ||२||
- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1114
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
वार्याच्या मंद झोतात गवताची
वार्याच्या मंद झोतात गवताची