एक (सु)विचार
मुंगी आकाराने लहान असते, पण ती तुमच्या पार्श्वभागाला चावू शकते पण म्हणून तुम्ही मुंगीच्या पार्श्वभागाला चावू शकता का?
नाही ना???
तात्पर्य : - कोणालाही कमी लेखू नका आणि कमी समजू नका.
चोरटा मुरारी - गौळण
लेखनविषय:
चोरटा मुरारी - गौळण
शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
सांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥धृ०॥
शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥१॥
यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
पकडाया जाता, होतो फ़रारी
चव हा चाखी, ओठ हा माखी
टांगा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी... ॥२॥
व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी...
अमेरीकी उन्मत्तपणा
भारतीय महीला राजदूत मीरा शंकर याना जॅकसन विमानतळावर
http://www.rediff.com/news/report/indian-envoy-meera-shankar-patted-down-at-us-airport/20101209.htm
ही अशी वागणूक देण्यात आली. गोर्या लोकांना भारतीय लोकांबद्दल हा असा आकस का असतो? त्यातून राजदूतसुद्धा सुटत नाहीत.
त्या ऑफिसरने जणू साडी नेसलेली महिला कधी पाहिलीच नव्हती का?
मात्र अमेरीकन अधिकारी हा मस्तवालपणा अरबांसोबत दाखवत नाहीत.
पुन्हा एकदा काश्मिर खोरे...
काश्मिर हा मुद्दा असा आहे की कोणी कितीही वेळा चर्चा करोत मात्र दरवेळी नव्याने चर्चा कराविशी वाटते. सध्या कारण आहे ते म्हणजे "इंडीया आफ्टर गांधी" हे पुस्तक. यातील "A Valley Bloody and Beautiful' हे प्रकरण नुकतेच वाचले. काश्मिर बद्दल अनेक नव्या गोष्टी कळल्या. त्यातील काहि रोचक तुकड्यांचा स्वैर अनुवाद इथे देतो आहे.
---------
राजा हरीसिंग सप्टेंबर १९२५ पासून काश्मिरचा महाराजा होता. त्याचा बराचसा वेळ "मुंबई रेसकोर्स" आणि शिकारीस जात असे. त्याच्या चौथ्या बायकोची तर तक्रार होती की तो 'कधीही लोकांच्या संकटाच्यावेळी त्यांच्यासोबत नसतो - त्यांना भेटत नाही.
[जोगवा] : एक वास्तवदर्शन
लेखनप्रकार
![]() | काही चित्रपट आनंदासाठी, विरंगुळ्यासाठी नसतातच. तुम्हाला ज्ञात-अज्ञात वास्तवाचा प्रत्यय आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात आपल्या आजू बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी, अस्वस्थ करणाऱ्या वास्तवांनी मनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं जरी एका व्यक्तीला शक्य नसलं तरी अशी व्यक्ती मग चार चौघांत आपलं मत मांडते, शक्य असेल तर मग जोगवा सारखी एखादी कलाकृती निर्माण होते. |
यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का करत नाहीत ?
डॉ. स्वामी हे एवढे शिकलेले सवरलेले आहेत तरीही आमच्या एका सगळ्यात ताकद्वान अशा राष्ट्रीय नेत्याची बदनामी करत हिंडत आहेत. यांना नेहरू गांधी ( महात्मा नव्हे) या घराण्यांची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ? आणि काँग्रेसचे लोक काय करत आहेत ? ते झोपा काढत आहेत की काय. का हे सर्व खोटे आहे ?
आपले मत जरूर नोंदवावे. मला तर यात स्वामींचा काहीतरी कावा दिसतोय. !
आपल्याला हे खरं वाटते का ? मला तर हे सगळे बनावट आहे असे वाटते.
पुतिन बर्याचदा मुद्द्याचे बोलतात, आजही बोलले!
आज रशियाचे पंतप्रधान (आणि खरेखुरे "बिग बॉस") असलेल्या पुतिनसाहेबांनी एक उत्तुंग षट्कार मारलेला आहे. वाचा इथे http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7065924.cms
(पुतिन यांचे 'दस नंबरी' निवेदन वाचून/ऐकून चिनी नेत्यांनीसुद्धा टाळ्या वाजविल्या असतील.)
पुतिन यांनी या आधीही यू-ट्यूबद्वारा असाच २०-२० छाप षट्कार मारला होता. तो दुवा सापडल्यास (नंतर) पाठवून देईन.
मोरपिसे....
सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला.
मिसळपाव
