५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..
बर्याच दिवसानी पुन्हा थोडे कवितेत लिहावे म्हणतोय .. आवडले तर सांगा...
चोचभर दाण्यासाठी
वेशी बाहेर पाखरं
टीचभर पोटासाठी
घर उंबर्याशी वैर ||
पाणी आटलं डोळ्यात
शेत जळलं रानात
पोर धाडलं शरात
गाव दुष्काळ पिडित ||
दारातली तुळस, कधीच.. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली...
पांढर्या रानागत, गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, होता जेंव्हा आवळला फास...
शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली अन्नाचा, कुठ हाय तपास...
शासनाची पांढरी बुजगावनी, फिरतात कधी शेतात..
काव्यरस
अशी बायको असती तर
अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात कफनी घालून,
रानावनात निघालो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अशी बायको असती तर
पेशवाई गाजवली असती,
मिजास मोठीकेली असती,
राजबिंडा बनून मिरावलो असतो
पर्वतीवर छोटस आमच असत घर
अशी बायको असती तर
सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो
आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो
तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर
अशी बायको असती तर
तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम
एक ते चार रोज मस्त केला असता आराम
दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर
उघडले असते शटर
अशी बायको असती तर
चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती
माझ्यास
काव्यरस
कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो.
फुल्लोर
झाळं आंब्याचं हिरवं
कसं फुलारुनं आलं
नवरीच्या वानी पिव्वी
जशी लपेटली शालं
( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )
दोनच पाय अन डुलत र्हाय
काळ्या टी-शर्टात आमचे अगोबा
छळायला बुवा नेहमीच हवा
पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा
वीरगळ शोधुन काढतात खोदुन
माहीत्यांचा तर नित्य धबधबा..
धाक दरारा अजून वाटतो
मिपात साऱ्या त्यांचा दबदबा..
फिरायला जातात घेवुन तेव्हा
दुसरे 'सर' सारखेच टाकतात डबा..
गणेशचे पान अन लझानिया छान
आरोग्याचा हाच मंत्र अजूबा..
तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन
लेण्या झिजवणे हाच मनसुबा ..
.............श्री. जा.ना.पावट्या
गद्य-पद्य
ताव मारीता जीभेने, विसरुन सारे ते पथ्य
बळ लाभता ओठांना, सुरसुरते ते मद्य
भाव उधळता मनाने, तोडून सारे जे बंध्य
कळ लागता जीवाला, सरसर सुचते ते पद्य
माझा नातू [प्रौढ कविता]
चार पाय अन अधांतरी काठी
पाच पायांचा आमचा नातू..
पाठ ताठ खांदेही ताठ
न दुखणारा खुबाही ताठ..
दृष्ट लागून पडले दात
हसताना नित्य बोळकांडी..
धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या याचा फवारा..
शाळेत जाई डबा घेऊनी
मधूनच परते होऊनी पिवळा..
रांगणारा पुरुष जणू हा
रोज ऊठून नवा तमाशा..
काव्यरस
सुख
हरवलेले ते सापडले
सापडले हरवल्यानंतर
हरवले सापडण्याआधी
कळाले सापडल्यानंतर!
तेच होते ते जरी
ते न राहिले तसे तरी
हवे होते ते तसेच तेव्हा
कळाले सापडल्यानंतर!
भाव पुसा बाजाराला
दाम जरी ना लाविला
अनमोल ते आहे खरे
कळाले सापडल्यानंतर!
शब्दांचा ना लागे ठाव
जरी दोन अक्षरांचा गाव
'सुख' म्हणती सारे त्याला
कळाले सापडल्यानंतर!
- संदीप चांदणे
काव्यरस
मिसळपाव