Skip to main content

बायको गेली माहेरी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/01/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे. कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा मारून एक खिळा, ती गेली आहे दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

घमघम घमघम

लेखक मीन यांनी गुरुवार, 07/01/2016 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
येश्या आजपन त्या मॉलच्या फाटकासमोर हुबा ह्रायला. गेले कितीतरी दिस त्यो रोज असा थितं थांबयचा.पन आजचा दिस येगळा व्हता. त्याच्या छातीतले ठोके व्हाडले हुते. हातपाय थरथरू लागले हुते. येश्या एका झोपडपट्टीत ह्रायचा. आय आन् बा संगं. आय, बा बांधकामावर मजुरी करायचे. येश्या वस्तीतल्या इतर पोरांबरुबर ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायचा. त्यादिवशी सिग्नलला आशीच येक गाडी थांबली हुती. येश्या पैकं मिळण्याच्या आशेनं गाडी पुसू लागला. सिग्नल सुटता सुटता गाडीची काच खाली झाली. कसलातरी घमघमाट येश्याच्या नाकात शिरला.

पुणे मुंबई पुणे

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/01/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याचा एक खेडवळ म्हातारा रात्री उशीरा कसाबसा सीएसटीला उतरला. प्रवासानं दमलेला, कपडेही मळलेले. फलाटावर उतरताच त्यानं कपडे हातानं नीट केले. मुंडासं डोक्यावर घट्ट बसवलं आणि आ करून इकडेतिकडे पाहात, हातातली पिशवी सावरत तो चालू लागला. मुंबईत मुरलेल्या टीसीच्या चाणाक्ष नजरेनं त्याला बरोबर हेरलं, आणि जवळ येताच हात आडवा करून त्या खेडुताला रोखलं. तिकीट दिखाओ'... टीसी म्हणाला आणि म्हातारा बावचळला. खिसे चाचपून झाले, पिशवीही उलटीपालथी केली. तिकीट सापडलंच नाही. टीसी खुश झाला. निकालो पैसे. फाईन भरना पडेगा'... टीसी म्हणाला आणि म्हातारा रडकुंडीला आला. 'बाबा रे, पैसे नही है माझ्याकडे'...

दोन मनिष

लेखक सनईचौघडा यांनी बुधवार, 06/01/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही कहांणी आहे माझ्या समोर घडलेल्या समान नावे असणार्‍या दोन मुलांची. त्यापैकी आज शेजारी (माझ्या आईच्या शेजारी) राहणार्‍या मनिषची ही कथा. माझ्यापेक्षा मनिष ४/५ वर्षेच लहान होता. या कुटंबाची घडी कधी नीट बसलीच नाही. सारखे काही ना काही संकट त्यांच्यावर येत गेले. मी जेव्हा ७ वीत होतो तेव्हा तो चौथीत होता. त्यामुळे तो तसा आम्हाला लिंबुटिंबु होता. तब्येतीने बारिक, सडपातळ, खाण्यापिण्याचा कंटाळा. जेवताना अन्न चिवडत बसायचा आई बाजुला बसुन भरवायची त्याला. लहानपणी त्याला जावळं येत नव्हते तेव्हा त्याच्या माऊलीने हरतर्‍हेचे उपाय योजले.

ऑपरेशन भाग 3

लेखक समीर१२३४५६ यांनी बुधवार, 06/01/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2 वरुन पुढे- रोहित संजयकडून सत्‍य जाणण्‍याचा प्रयत्‍न करत असतो, परंतू संजय त्‍याला काहीही सांगायला तयार होत नसतो,त्‍यामुळे तर रोहितचा संशय अधिकच बळावलेला असतो. काही दिवसांनी शवविच्‍छेदन अहवाल पाठवला जातो,त्‍यात संजयच्‍या भावाला विष दिल्‍याचे निदान झालेले असते. रोहितला खात्री पटते, की यात संजयचा काहीतरी कावा आहे, काही दिवसांनी संजय व त्‍याचा एक साथीदार येऊन रोहितला शवविच्‍छेदन अहवाल बदलण्‍याची धमकी देऊन जातात. रोहित त्‍यांचे ऐकायला तयार होत नाही, तेव्‍हा संजय रोहितला त्‍याच्‍या पत्‍नी व मुलाला ठार करण्‍याची धमकी देऊन जातो.

सोशल नेटवर्किंग (भाग ३)

लेखक लाडू. यांनी बुधवार, 06/01/2016 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मयंकच्या hi ला आज अखेर श्रावणीने उत्तर दिले होते सकाळी सकाळीच. मयंक खूप खुश झाला. ताबडतोब डोळ्यावरची झोप उडवत तिच्याशी बोलू लागला. पण तसे करताना आपल्याला ती आवडते याची पुसटशी शंकाही तिला येऊ नये याची खबरदारी तो घेत होता. हि त्याच्या नेहमीच्या ट्रिक्स मधली एक ट्रिक होती. आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याला हे माहित होते, मुलींना जास्त भाव दिला कि मग त्या गृहीत धरतात आपल्याला.

ज्यू असण्याचे जोखड

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 06/01/2016 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
रोज शरीराची मशाल पेटवावीच लागते, इच्छा असो वा नसो तसे फारसे पर्यायही उपलब्ध नसतात मग उगाचच वाटत राहतं आपण नाझींच्या छळछांवणीतले ज्यू आहोत म्हणून ...... यातनागृहे सर्वत्रच आहेत तक्रार करण्यात हशील ते काय ? जे भोगायचे ते निमुटपणे फक्त आरश्याला सांगायचे तेही डोळे मिटून कारण उघड्या डोळ्यांनी आरसा बघवत नाही अन त्यात दडले नापाक असे हे शरीर....