मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

प्रसन्न केसकर ·
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा भाग एक - http://misalpav.com/node/८१२७ भाग दोन - http://misalpav.com/node/8138 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

प्रसन्न केसकर ·
लेखनप्रकार
आधीचा भाग येथे वाचा http://misalpav.com/node/8127 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष.

क्रिप्टीकप्रतिपालक

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू. "हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू. आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच. एकंदरीत माहीती अशी मिळाली. मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते. दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले) मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २.

आली पन्नाशी!

बहुगुणी ·
Taxonomy upgrade extras
वडा-सांबार खावं, नाहीतर छोले-पुरी चमचमीत सारं शेवटी येणार घशाशी! तरूणांची मजा आहे, येऊन आमच्या घरी, नावालाच यजमान, पण आम्ही आपले उपाशी आली पन्नाशी! पोट आड येतंय, म्हंटलं खुर्ची मागे सरकवावी जराशी जमतंय असं वाटलं पण टेबल पडलं तोंडघशी! आली पन्नाशी! 'सकाळी जावं पळायला, अजून झालं नाही वय' 'जलद चालणं' बरं वाटलं, पहिल्याच दिवशी 'आधिक ताण बरा नव्हे, हळू-हळू होईल सवय' कुणाला माहीत इथे, व्यायाम खातात कशाशी आली पन्नाशी! 'ट्रेकींगला निघालाय?

झबडं - टोपलं

अरुण वडुलेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरांत महिला वर्गाची लगबग चाललेली. निमित्त कुणाच्या तरी बारशाला जाण्याची. "बाबा, बाळंत विडा काय घ्यायचा?" सूनबाईंची पृच्छा (अर्थात्‌ उगाचच ) "घ्या एक झबडं टोपलं" सूनबाईंचं चमकून पाहाणं. "मग वांदीचा चाळा नको कां?"सूनबाई. चेहर्‍यावर एक खट्याळ हसूं. मी पहिल्या क्षणी भांबावलेला. दुसर्‍या क्षणी ओशाळवाणा. तिसर्‍या क्षणी एक सार्वजनिक हास्य स्फोट. वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत?

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

आनंद घारे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिपावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते. "१. स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधार्‍या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची." "२.

कैफियत ....

बट्ट्याबोळ ·
लेखनप्रकार
मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली. एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली.

झाला तो सत्वर, मॅनेजर!

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एकतर दुपारच्या जेवणानंतर लगेच असलेली मीटिंग मला अजिबात आवडत नाही! त्यात भर दुपारच्या मीटिंग दरम्यान आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करुन झोप टाळायची आणि समोर सुखेनैव सुस्तावलेले काही डोलकर प्राणी बघितले की आपण जाणीवपूर्वक डोळे उघडे ठेऊन का बसलो आहोत ह्याचा सात्विक संताप येतो! X( पूर्वी जात्यावर जशा बायकांना ओव्या स्फुरायच्या ना तव्दतच अशाच एका मीटिंगच्या दळणादरम्यान स्फुरलेल्या ओव्या! ;) (ओव्यांच्याच चालीवर म्हणून बघा!

मिपावाल्याचे गाणे

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेरणा एक खूप गरीब मिपावाला मिपावर आनंद मिळवायला (हॅपिनेस) येत असे. टोकाच्या सालसपणामुळे त्याच्याकडील प्रतिसाद देण्याची शैली अगदी सोज्वळ असते व त्यातुन हिन आणी हिणकस काथ्याकुट, लेख डोक्यावर कधी चढुन जात हे त्याला बिचाऱ्याला मिपावर आनंद मिळवताना कळतही नसे. त्याची दया येऊन एक कंपुबाज त्याला एक नवी कोरीकरकरीत प्रतिक्रिया द्यायची स्टाईल देतो. त्यामुळे प्रतिसादातुन आसुड घेऊन मारताना साहजिकच त्याचे मन आनंदुन जाते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो- "आ देखे जरा किसमे कितना है दम".. असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!

पुरावा काय?

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल संध्याकाळी फिरता फिरता चौपाटीवर गेलो. (मुळामुठेच्या काठाला आजकाल चौपाटी म्हणायची फॅशन आहे पुण्यात) सहज लक्ष गेले आणी एक परिचीत चेहरा दिसला, जवळ गेलो आणी पाहिले तर काय आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. "पण तुला सांगितला कोणी होता शहाणपणा ? चांगले खरडा खरडी खेळत होतास, विडंबन करत होतास... हे भलतेच शहाणपण कुठुन सुचले तुला?" मी हळुच त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या बरोब्बर तो दचकला. "नाना अरे मी आहे परा" मी म्हणालो. "मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला." नाना मामला गंभीर आहे हे ओळखुन आम्ही नानाला घेउन बळेबळेच पाणवठ्यावर दाखल झालो.