मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिप्टीकप्रतिपालक

परिकथेतील राजकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू. "हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू. आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच. एकंदरीत माहीती अशी मिळाली. मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते. दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले) मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २. टारझन ( का का का ????) सर्वप्रथम माझा होता, म्हणून मला फोन. (च्यायला पी हे अक्षर टी च्या आधी का येते ? का का का?) मी त्यांना चांगल्या डॉक्टरकडे (शक्यतो पुरुष) घेउन जायचा सल्ला दिला,डॉक्टर कडे गेल्यावर पुन्हा फोन करायला सांगितले. तसा फोन आल्यावर मी डॉक्टरना झाल्या प्रकाराची कल्पना दिली. डॉक्टर पण हुशार होता. त्याने मास्तरना एक इंजेक्शन देउन त्याना आधी शांत केले, मग इतिहासा पेक्षा नजिकच्या घटनांचा शोध घ्यायला सांगितला. मास्तरना डॉक्टरने खालील विषयावर संशोधन करायला सांगितले. १. पॉटी ट्रेनिंग चा सर्व प्रथम वापर २. पहीले अक्षर कुठले ? (सर्व सामान्याप्रमाणे ते अ नसेल ह्याची डॉक्टरला खात्री होति) ३.पहीला उदघाटन समारंभ (लग्ना आधीचा, लग्नानंतरचा) ४.पहीले समुपदेशन ५.मिपावरचा पहीला क्रिप्टीक लेख ६.'क्रिप्टी़क' उपाधी सर्वप्रथम केंव्हा मीळाली ? ७. कुणी दीली ? ८. का दिली ? ९. मास्तरां विषयी विकिपिडीयामध्ये काही माहिती आहे का ? १०. अफजल कसाब हा देशभक्त आहे का देशद्रोही ? ह्या अभ्यासात गुंतलेले मास्तर आता बरे आहेत. छोटा डॉन चा उद्धार आता करत नाहीत. (अरे रे)

वाचने 2952 वाचनखूण प्रतिक्रिया 13

इनोबा म्हणे 02/06/2009 - 18:14
व्यवस्थित बरे झालेत ना? नाहीतर एखाद्या चांगल्या समूपदेशकाकडे घेऊन जा. ;)

In reply to by इनोबा म्हणे

निखिल देशपांडे 02/06/2009 - 18:35
नाहीतर एखाद्या चांगल्या समूपदेशकाकडे घेऊन जा +१ सहमत बाकी परा मस्त जमलय रे.... मास्तर काय क्रिप्टीक घालतायत ह्यावर बघायला पाहिजे??? ==निखिल

पर्नल नेने मराठे 02/06/2009 - 18:18
मास्तर, गुर्जी 8| नाना, तात्या :T कोण कोणाचा पत्ता लागत नाहिये चुचु

छोटा डॉन 02/06/2009 - 18:22
_/\_ आग्गायायाया, काय लेखाची कल्पना आहे बॉ ? अरे पुण्यात उन्ह लै वाढले का रे , लोकांना मस्तकज्वर चढल्यासारखे वाटत आहे ... >>दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले) =)) =)) =)) धन्य आहात तुम्ही आणि तुमचे गुर्जी ... बाकी प्रश्नांची उत्तरे सवडीने. ------ (उद्धारकरविता ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अनंता 02/06/2009 - 18:36
बारा वाजेपर्यंत तर मास्तर ठीक होते :) हा घ्या पुरावा : लय प्रेषक विनायक प्रभू ( मंगळ, 06/02/2009 - 11:53) . भारी चालु द्यात. » उत्तर द्या प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

नितिन थत्ते 02/06/2009 - 18:39
हे बाकी भारी हां परा. खराटा (रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू 02/06/2009 - 19:03
एक सांग परा. तुझी आणि दु:शासनाची जन्मतारीख एक आहे कारे? अरे किती वस्त्रे फेडाल? अरे चुकलो, तसा काहीही प्रकार झाला नव्हताचे प्रतिसाद येतील वर्जिनल श्लोक किती ह्याचे पुरावे येतील.

In reply to by विनायक प्रभू

परिकथेतील राजकुमार 02/06/2009 - 19:13
हे हे हे तुम्ही लोकांच्या समस्या मांडता म्हणुन आज मी तुमची समस्या मांडली. परालिया प्रभु ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 02/06/2009 - 20:26
=)) =)) =)) वा !! मास्तर ... घरी अंमळ बरं आहे ना हो ? टारायक महाप्रभू ©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º©

अवलिया 02/06/2009 - 19:27
वा! मस्त !! परा लेका अजुन नवे आंबे नाही आले का रे ? --अवलिया

बिपिन कार्यकर्ते 03/06/2009 - 02:23
परा!!! काय रे हे? *ट काय कळले नाही. :( बिपिन कार्यकर्ते