वडा-सांबार खावं, नाहीतर छोले-पुरी
चमचमीत सारं शेवटी येणार घशाशी!
तरूणांची मजा आहे, येऊन आमच्या घरी,
नावालाच यजमान, पण आम्ही आपले उपाशी
आली पन्नाशी!
पोट आड येतंय, म्हंटलं
खुर्ची मागे सरकवावी जराशी
जमतंय असं वाटलं
पण टेबल पडलं तोंडघशी!
आली पन्नाशी!
'सकाळी जावं पळायला, अजून झालं नाही वय'
'जलद चालणं' बरं वाटलं, पहिल्याच दिवशी
'आधिक ताण बरा नव्हे, हळू-हळू होईल सवय'
कुणाला माहीत इथे, व्यायाम खातात कशाशी
आली पन्नाशी!
'ट्रेकींगला निघालाय?