Skip to main content

विनोद

( फौल ) : स्पॅनिश व्हर्शनसह ...

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 25/06/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
काल अवलियांनी त्यांचे 'रुळ' हे काव्य मिपावर टाकुन मॅच सुरु झाल्याची शिट्टी वाजवली आणि त्यानंतर एक से एक महारथी मैदानात उतरले आणि त्यांनी धडाधङ गोल मारुन अगदी बाजार उठवला. पण आम्ही काल जरा 'इंज्युयर्ड' असल्याने बेंचवरुनच हे सामने पाहिले, आज आमच्याअ फिजियोने आम्हाला फिट घोषीत केले अहे व आम्ही मैदानात उतरलो आहोत ...
काव्यरस

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2010 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर. टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
काव्यरस

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
काव्यरस

पेपराचं फेफरं

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 16/06/2010 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीचं अतिरेकी वेड किंवा छंद उफाळला की 'आलं का फेफरं?' असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातो. आमच्या पेपराचं फेफरं असंच नाक मुरडण्यासारखं. पेपर म्हणजे परिक्षेच्या उत्तरांचा अथवा प्रबंधाचा नसून आमच्यालेखी 'समाजमान' आणि 'भान' या संबंधाचाच आहे. कालच्या वर्तमानाचा भूतकाळ आज वर्णन करणारे ते एक 'पत्र' जरी असले तरी त्याला पाने मात्र अधिकच असतात. तसं पाहिलं तर पोस्टाचे पत्र आता कालबाह्य झाल्यातच जमा आहे. 'आपली चालू वर्षाची सदस्य वर्गणी त्वरित जमा करा अन्यथा पुढील अंक पाठविला जाणार नाही' अशा आशयाची 'पत्रे' फलाण्या बिस्ताण्या अंकाच्या संपादकाकडून वर्षभर येत राहतात.

मॅनेजर्स

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/06/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर - खालील व्यक्ती पूर्ण धवल अथवा कृष्ण नव्हत्या अर्थात खूप चांगल्या जमेच्या बाजूदेखील दिसल्या. माणूसकी, कामावरील निष्ठा, व्यावसायीकता, सचोटी हेदेखील गुण काहींच्यात होतेच. पण आपल्या बॉसवर टीका हा सदाबहार विषय आहे म्हणून हा लेख ... मान्य की मॅनेजर्स ना काम करवून घ्यायचं असतं पण कधीकधी त्याकरता ज्या उपायांची अंमलबजावणी ते करतात ते मला तरी विनोदी वाटतात.

डाळिंब सोलण्याची कला

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 13/06/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
डाळिंब व्यवस्थित सोलणे हे मनीचं गूज खोलण्याइतकंच कठीण काम असतं. मधुमिठास बोलणे काय किंवा इच्छित निसरगाठी खोलणे काय दोन्ही गोष्टी एकाच पाटातून वाहणाऱ्‍या! त्या वाहत्या, खळाळत्या प्रेमजलात (किंवा जालात म्हणा हवं तर) संबंधित प्रेमीजन कसे-किती-कोठवर वहावत जातील याचा अंदाज भल्याभल्यांनाही येत नसतो. पाटाने वहिवाट मोडल्यावरच भानावर येणं होतं! तद्वत डाळिंब सोलण्याअगोदर आत काय दडलंय? टिप्पूर दाणे आहेत की नुसताच भुललासी वरलिया रंगा असा प्रकार आहे, याचा अदमास ना चाकूला असतो ना काकूला. डाळिंब विक्रेती काकू कितीही म्हटली की ते झाडावरच टचकन् फुटलंय, यावर पटकन विश्वास ठेऊ नये बंधूंनो.

नाष्टा-ए-पाणीपुरी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 05/06/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुऱ्‍यांतून पाणी पिणं काय किंवा पाण्याच्या पुऱ्‍या खाणं काय, दोन्ही एकाच आंबट पाण्याच्या दोन बाजू. तिसऱ्‍या बाजूकडून म्हणजे रस्त्यावरून माझ्या नजरेत तो पाणीपुरीचा ठेला भरला. तिथे उपस्थित जनसमुदायाला पाणीपुरी गिळतांना पाहून माझ्याही पोटात कोरड पडली. वळवळणाऱ्‍या जिभेभोवती चळाचळा पाणी सुटले. तरीही त्या पुऱ्‍यांमधल्या आंबट गोड पाण्याची पंचस्वादीय चव जिभेला खूपच हवीहवीशी वाटली अन् त्यामुळेच की काय पाच गिर्रेबाज गोल पुऱ्‍यांची डोकी टचाटचा फुटली! अन् फुटक्या डोक्यानिशी बशीत दाटीवाटीनं आसनस्थ होण्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणखी काय काय पहावं लागणार गं बाई..

रविवारची सकाळ - अपडेटेड

लेखक रम्या यांनी मंगळवार, 01/06/2010 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारच्या सकाळी जांभई देत उठलो. कामाची सुट्टी, पेपर वाचन, रविवारची पुरवणी, फक्त खाणं आणि तंगड्या पसरून टि. व्ही. पहाणं. काय साला दिवस आहे! नाद करायचा नाय! आंघोळ उरकून पेपर उघडला आणि आत आवाज दिला, "चहा आंण गं आणि बरोबर कांदपोहे सुद्धा" बाहेर फक्त चहाच आला. "कांदेपोहे कुठे आहेत?" "मिळणार नाहीत" मिळणार नाहीत? म्हणजे काय? रविवारच्या सकाळी सकाळी तिरसट उत्तर? धोका आहे राव. विचार करून पाहीला. काल भांडण वगैरे तर काही झालं नव्हतं. टि. व्ही. वरच्या बर्‍याच कार्यक्रमात दाखवतात, बायकोचा वाढदिवस पती विसरला कि मग बायको रागावते. च्यामारी कसा काय विसरलो मी?

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 30/05/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात. :-) ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच.