मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅनेजर्स

शुचि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डिसक्लेमर - खालील व्यक्ती पूर्ण धवल अथवा कृष्ण नव्हत्या अर्थात खूप चांगल्या जमेच्या बाजूदेखील दिसल्या. माणूसकी, कामावरील निष्ठा, व्यावसायीकता, सचोटी हेदेखील गुण काहींच्यात होतेच. पण आपल्या बॉसवर टीका हा सदाबहार विषय आहे म्हणून हा लेख ... मान्य की मॅनेजर्स ना काम करवून घ्यायचं असतं पण कधीकधी त्याकरता ज्या उपायांची अंमलबजावणी ते करतात ते मला तरी विनोदी वाटतात. पुढे देतेय मी अनुभवलेल्या , मॅनेजर्सच्या स्वतःचं वजन (मूल्य) वाढवायच्या काही ट्रीक्स (उपाय) - (१) हाताखालच्या लोकांची मीटींग बोलावून त्याला उशीरा जाणं (जसं काही भेंडी यांनाच काम असतं बाकी सगळे गोट्या खेळत असतात ऑफीसात.) (२) सुतकी (बाप मेल्यासारख्या) चेहेर्‍याने मीटींगमधे वावर ठेवणे. (३) वरचेवर हे आश्वासन देणं की आपण हा माइलस्टोन नक्की साजरा करू (मॉरल बूस्टर म्हणे). अनुभव हा की "गर्जेल तो पडेल काय?". (आणि कधी षठीसामासी साजारा केलाच तर काहीतरी पिझ्झा वगैरे चीप पडेल असं पहात करायचं.) (४) टीम मधील लोकांमधे पंक्तीप्रपंच अर्थात डिस्क्रिमिनेशन करणे. (५) एका सुरळीत रांगेत ("प्रोसेस" मधे) काम चालू असताना मधेच येऊन विनाकारण (ऑन द फ्लाय) सूचनावजा आणि कामं देऊन जायचं. (६) मी एका कंपनीत होते तिथे आम्हाला दरमहा पुस्तक-भत्ता मिळायचा. तो सर्वात भयानक विनोदी प्रकार होता. त्यात महीना अखेरीला मॅनेजरच्या दाराशी जाऊन त्याच्या शुभ हस्ते चेक घ्यावा लागत असे. आपण काही मनुष्यस्वभावातील विसंगतींचं नीरीक्षण केलं असेल काम करत असताना विशेषतः बॉसच्या संदर्भात तर जरूर इथे सांगा.

वाचन 5607 प्रतिक्रिया 0