मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

थोडेसे 'रंग'वणे

चतुरंग ·
वडापाव मिळणार असे समजून जावे आणि अचानक पुरणपोळी समोर यावी तसा मिसळपावावर 'थोडेसे शब्दवणे' हा लेख सामोरा आला. अलवार पुरणपोळीवर पातळ तुपाची धार पडून डाराडूर वामकुक्षीची दवंडी पिटणारा. शब्दनशब्द दवणीय रसाने ओथंबलेला. 'लिखाळ' हे दवण्यांचे टोपण नाव तर नव्हे असे वाटून मी नखे कुरतडतो! पुलाखालच्या कविता करण्यासाठीच खरेतर लिखाळाने कलम हाती घ्यावे. त्याच्या भेसूर कवितेचे जसे शब्द, तसे हे उंबराला आलेले फूल. लिखाळाच्या अनिर्बंध काळ गायब होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी प्रतिसाद कर्त्यांचे सर्व प्रयत्न. पण तो या सर्वांहून फार हुशार.

मी आणि बीपी

निशदे ·
"मला हाय बीपी dignose झाले आहे." आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला. पण या प्रस्तावानेकडे येण्याआधी अगदी जवळच्या भूतकाळात डोकावून पाहिले पाहिजे. १५ दिवसांपूर्वी: सोमवारी सकाळी उठल्यावर रेग्युलर कामे आटपली. या कामाना रेग्युलर म्हणायचे हे लहानपणापासून सर्व लोक म्हणत असल्याने मीसुद्धा त्यांना रेग्युलर कामे म्हणतो. पण हा शब्द मला मान्य नाही. रेग्युलर कामे म्हणजे ज्यामध्ये इनपुट ठरलेले आणि आउटपुट देखील ठरलेले. मात्र सकाळच्या कामांचे आउटपुट रात्रीच्या इनपुट वर ठरलेले असते. रात्रीचे इनपुट बिघडले कि सकाळचे काम रेग्युलर होण्याची शक्यताच नाही. एकंदरीत हा सगळा मामला गोंधळाचा आहे. असो.

किस्सा पटवारी का...

चिगो ·
धागा प्रेरणा : http://www.misalpav.com/node/17449 गुजरातच्या "भु-खंड संगणकीकरण" बद्दल माहीती देतांना एका अधिकार्‍याने सांगितलेला हा किस्सा :
एकदा चिफ सेक्रेटरी (राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी) कुठल्याशा दौर्‍यासाठी एका गावातून जात होते. रस्त्यात काही गाई-म्हशी आडव्या आल्या आणि चुकून एका गाईला त्यांच्या गाडीचा पुसटसा धक्का लागला. झालं, गुराखी लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं आणि भांडायला लागले. ड्रायव्हरने खुप समजावून सांगितलं, की अरे बाबांनो, मोठे साहेब आहेत. अमुक नी तमुक... पण अंहं, गुराखी काही ऐकायलाच मागेनात.

महसूल वार्ता!

आळश्यांचा राजा ·
प्रेरणा - येऊ द्या आणखी महसूल वार्ता !! - (भाऊसाहेब) रामदास) एकदा इंद्राने सगळ्या सरकारी यंत्रणेला मेजवानी द्यायचे ठरवले. या पापी लोकांना अशी स्वर्गात पार्टी देण्यामागे इंद्राचा अंतस्थ हेतू बहुदा एखादा भूखंड लाटण्याचा असावा अशी दाट शंका बर्‍याच देवांना होती. पार्टीत इंद्र कुणा कुणाला कशी वागणूक देतो यावर बर्‍याच जणांचे लक्ष होते. संध्याकाळी सात पासून पाहुणे यायला सुरुवात झाली. स्वर्गीय संगीताच्या तालावर अप्सरा नृत्य करु लागल्या. त्रिभुवनातील उत्तमोत्तम आणि प्राचीनतम मद्यांचे चषक किणकिणत पाहुण्यांमधून फिरू लागले.

वॅलेंटाईन वॅलेंटाईन

विनीत संखे ·
"संत वॅलेंटाईन, काय माणूस होता सांगू ! एकदम झक्कास. प्रेमास अमर करून गेला बेटा! त्याची समाधी कुठे आहे सांगाल का? ऑर्किडची फुलं सजवायची होती त्यावर मला.", आता हे मी लिहित नाहीये किंवा लिहितच असेन तर माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल हे सुज्ञास सांगणे नलगे. "वॅलेंटाईनविषयी लिही ना", असं विनंतीवज फर्मान माझ्या गुलबक्षीने (गर्लफ्रेण्ड हो!) गेल्या आठवड्यात काढल्यावर मी माझं मराठी टायपिंगचं सॉफ्टवेयर कॉम्प्युटरमधून काढून टाकलं होतं.