थोडेसे 'रंग'वणे
वडापाव मिळणार असे समजून जावे आणि अचानक पुरणपोळी समोर यावी तसा मिसळपावावर 'थोडेसे शब्दवणे' हा लेख सामोरा आला. अलवार पुरणपोळीवर पातळ तुपाची धार पडून डाराडूर वामकुक्षीची दवंडी पिटणारा. शब्दनशब्द दवणीय रसाने ओथंबलेला. 'लिखाळ' हे दवण्यांचे टोपण नाव तर नव्हे असे वाटून मी नखे कुरतडतो! पुलाखालच्या कविता करण्यासाठीच खरेतर लिखाळाने कलम हाती घ्यावे. त्याच्या भेसूर कवितेचे जसे शब्द, तसे हे उंबराला आलेले फूल. लिखाळाच्या अनिर्बंध काळ गायब होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी प्रतिसाद कर्त्यांचे सर्व प्रयत्न. पण तो या सर्वांहून फार हुशार.
मी नव्या उत्साहाने प्रतिक्रिया वाचून पुढे जाणार तोच सुडंबन करावे की नको अशा आशयाची प्रतिक्रिया वाचली, म्हणालो, असे लेख पाडायचे ते रिवर्स इंजिनियरिंग साठीच ना! मग असे सोडायचे कशाला. हा वेडेपणा नाही का? चला आपण त्या ताजमहालाला विटा लावूयात!
माझ्या मेंदूत विडंबन तरारले.
आज पाडव्याच्या मुहूर्ताला ही विडंबनाची गुढी उभारूयात!
एका विडंबकाने लिखाळाच्या दवणीय लेखणीला दिलेली ही दाद आहे.
-चतुरंग
वाचने
2375
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हा हा हा
_____/\______ रंगा इज ब्यॅक!!
व्वा ! रंगाजी वा !!
सुडंबन!
In reply to सुडंबन! by पैसा
या लेखाच्या निमित्ताने चतुरंग
छान