किस्सा पटवारी का...
धागा प्रेरणा : http://www.misalpav.com/node/17449
गुजरातच्या "भु-खंड संगणकीकरण" बद्दल माहीती देतांना एका अधिकार्याने सांगितलेला हा किस्सा :
एकदा चिफ सेक्रेटरी (राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी) कुठल्याशा दौर्यासाठी एका गावातून जात होते. रस्त्यात काही गाई-म्हशी आडव्या आल्या आणि चुकून एका गाईला त्यांच्या गाडीचा पुसटसा धक्का लागला. झालं, गुराखी लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं आणि भांडायला लागले. ड्रायव्हरने खुप समजावून सांगितलं, की अरे बाबांनो, मोठे साहेब आहेत. अमुक नी तमुक... पण अंहं, गुराखी काही ऐकायलाच मागेनात.
ड्रायव्हर, पट्टेवाला सगळे विचारात की कसं करावं आता? तेवढ्यात गर्दी पाहून सायकलवरुन येणारा एक माणुस थांबला. त्याने ड्रायव्हरला काय झालं ते विचारलं. ड्रायव्हरला कळलं की तो पटवारी आहे, म्हणून त्याने त्याला सांगितलं की बाबारे, चिफ सेक्रेटरी आहेत वगैरे... झालं, पटवारी डाफरला गुराख्यांवर..
गुराखी बिचारे धावत धावत आले चिसेंकडे.. पाया-बिया पडायला लागले आणि म्हणतात ,"अरे साब, पैलेही बताना था की आप पटवारी के आदमी हो !!!"
वाचने
2451
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
प्रतिक्रिया
हा... हा ...,
चिगो साब, आप किसके आदमी हो ????????.................... :wink:
In reply to हा... हा ..., चिगो साब, आप by सुधीर१३७
मै सरकार का (अमिताभ नव्हे !) आदमी हुं...
हा हा हा...
ऑफिसमध्ये आवडला हा जोक सर्वांना.
हा! हा! हा! घातला ना लोणच ची से च!!
प्रत्येकासाठी " देव " वेगवेगळा असू शकतो. :) :)
लय झ्याक राव.
हा हा हा हा!!! :D
--असुर
हा... हा ..., चिगो साब, आप