मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कंपासपेटी

मंदार दिलीप जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तू मोज त्रिज्या, पण फार आक्रसू नकोस परीघ असं का बघते आहेस आश्चर्याने फिरव की तुझा हात पटापट तुझ्या वहीवर लिहून थांबू नकोस नाहीतर मी राहीन घुटमळत तुझ्यापाशी तो पर्यंत माझ्याही वहीवर उमटत नाहीत तुझी अक्षरे जो पर्यंत चल लवकर मोज व्यास दे उत्तर चटकन् उशीर करू नकोस फार वेळ नाही राहीलाय कारण . . . . . . . . . . . . . . . गधडे, मी कंपासपेटी घरीच विसरलोय.

वाचने 1713 वाचनखूण प्रतिक्रिया 3

पैसा Fri, 03/21/2014 - 22:06
तुमच्या या कविता शाळेच्या विश्वात परत नेतात.