तद्दनबाई गेली...................................!
लेखनप्रकार
शीर्षकांत शेवटी पूर्णविरामांची लांबलचक गाडी असल्याशिवाय वाचकांना लेख उघडून पहावासा वाटणार नाही, अशी भीती इथे अनेक लेखकांच्या मनात आहे असे अलिकडे दिसून येते. ह्याच भीतीचा कासरा धरून, मीही तसेच केले आहे.
तर तद्दनबाई गेली. कधी ना कधीतरी ती, आपल्या सर्वांप्रमाणे जाणार होतीच. पण तरीही तिचे जाणे मात्र माझ्या मनाला लागले. कारण एक जमाना तिने काय गाजवलाय म्हणता!
तो मूकपटांचा जमाना होता. मुंबईत इनमिन चार- पाच सिनेमा हॉल तेव्हा होते. त्यातील ऑपेरा हाऊस व स्वस्तिक आम्हा मध्यमवर्गीय गिरगावकरांच्या सोयीचे! म्हणजे पिला हाऊसचे सूप्त आकर्षण खूप असायचे आम्हा सर्वांच्या मनांत, पण तिथे जाण्याचे धैर्य मात्र आम्हा कुणाचेच नव्हते. त्या वस्तीतून जाणार्या ट्रामींच्या वरच्या मजल्यावर बसून तेव्हढीच जातायेता आजूबाजूस पाहून जी काय मजा चाखायची तितकीच. पण ते असो.
तर तद्दनबाई तेव्हा ऑपेरा हाऊसमध्ये मध्यंतरात पिटातून गायची. मंडळी काय आवाज होता तिचा सांगू! एकदम छप्पर फाडके!! बाजूस पायपेटीवर शिवा कांबळे आणि तबला गळ्यात बांधून तिच्याबरोबरीने उभा नाना पोफळे! काय धम्माल करायची ही तिघे! रात्रीच्या शेवटच्या शोची गंमत तर अगदी न्यारीच. ट्रामी थांबल्या असायच्या, व्हिक्टोरीयांतून येजा करणार्या शेटजींची वर्दळ कमी व्ह्यायची. तेव्हा तद्दन जो आवाज लावायची!! आहा.... काय सांगू महाराजा, तो आवाज पार पलिकडच्या स्वस्तिकात जाऊन घुसायचा. तिथे त्यांचा शो बंद करावा लागायचा त्यांना! तिथले पब्लिकही मग तद्दनच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचे! ही मध्यंतरे संपूच नयेत असे तेव्हा वाटायचे. पण ती संपायची, चित्रपटाच्या उर्वरीत भागातील मारामार्या वगैरे पाहून मंडळी घरोघर पांगायची तेव्हा रात्रीचे २ वाजून गेलेले असायचे.
पुढे ते सगळेच चित्र विस्कटत गेले. मूकपटांचा जमाना गेला, चित्रपट बोलपट झाले. नायक- नायिका स्वतःच गाऊ वगैरे लागल्या. नंतर तर पार्श्वगायनाचा प्रकार सुरू झाला. तरीही हे नायक व नायिका गाण्यात मजबूत होते बरं का? जोहराबाई अंबावाली, राजकुमारी, अमुक बेगम, तमुक बेगम.... काय ते त्यांचे बुलंद आवाज!! व्वा, व्वा. मग हेही चित्र अजून विस्कटले, ती तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज घेऊन आल्यावर. नंतर तर मला काही ऐकवेना.
तद्दनच्या जाण्याने त्या सगळ्या आठवणी, आमचे फोरास रोड, केनेडी ब्रिज असल्या रस्त्यांवरून जाणार्या ट्रामींत वरच्या मजल्यावर बसून घेतलेली 'मज्जा', तद्दनचे रात्रीचे खुल्या आवाजातले पिटातले गाणे... हे सगळे पुन्हा एकदा जागे झाले मनांत!
वाचने
11382
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज
In reply to तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज by सुबोध खरे
+++१११
In reply to तुमची लता का फत्ता तिचा तो पात्तळ आवाज by सुबोध खरे
धटम् भिंद्यात...
टंग इन चीक
जोहराबाई आणि--
हाहा!
तद्दनबाईंसारखे कलाकार खरं तर
स्मरणाचा उत्सव जागुन
मज्जा
हा हा... मस्तं जमलय.
मस्तं!
त्या बाजाच्या
लता का फत्ता
लेखनविषयः विनोद
आभार
In reply to आभार by प्रदीप
हा प्रतिसाद दिलेला आहेत तर
In reply to हा प्रतिसाद दिलेला आहेत तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
निमीत्त
In reply to आभार by प्रदीप
माझ्या मते हा प्रतिसाद यायला
शीर्षक वाचून 'तद्दनबाई' चा
हा हा!
झकास! याला म्हणतात सटल्टी.
जीओ प्रदीपजी जीओ.
झोहरा सहगल आजी गेल्या
कोण तद्दनबाई?
(No subject)
लय भारी!
In reply to लय भारी! by धमाल मुलगा
अवांतर
In reply to अवांतर by विकास
ज्येष्ठांनी असं अवांतर केलेलं
बर्याच काळानं प्रदीप ह्यांनी
In reply to बर्याच काळानं प्रदीप ह्यांनी by विजुभाऊ
१००% अनुमोदन.
कोण तद्दनबाई? धन्यवाद !!
In reply to कोण तद्दनबाई? धन्यवाद !! by सूड
+१