Skip to main content

"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला

लेखक विदेश
गुरुवार, 19/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -) "आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला सरकारी दरबारी 'कुणकुण 'ता चांगला ! ह्या आमच्या बंगल्याला संधीचं दार - भेसळींच्या पोत्यातनं तिथून वसूल फार ! रोज रोज नोटांच्या ' पेटया ' दोन - ' आल्या आल्या ! '- म्हणायला, छोटासा फोन ! ' बिस्किटां'च्या प्राप्तीवर जोर छानदार - ' परमिटां'च्या भांडणात फुल्ल हाल हाल ! खंडणी-खोरामागे बंदा हा रहातो, मोठ्याशा फायलीशी लपाछपी खेळतो ! ' उच्च उच्च डोक्यां-'चा खेळ रंगला ; लफड्यांचा घोटाळा ' वर ' टांगला ! किती किती सुंदर हाच आमचा बंगला ! भूखंड लाटूनी छानछानसा बांधला !!
लेखनविषय:

वाचने 1648
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया