Skip to main content

गातेस घरी तू जेव्हां

प्रकाशित मुखपृष्ठ
( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) गातेस घरी तू जेव्हां जीव सुटका-सुटका म्हणतो शांतीचे विणता धागे संसार नेटका होतो ! छत भंगुन वीट पडावी हल्लाच तसा ओढवतो ही पाठ कणाहिन होते अन् चेहरा बारका होतो ! ये घरमालक दाराशी हळु गाण्या , तो खडसावे खिडकीच्या उघडुन दारा तो बोंबा मारून जातो ! वळ पाठी उमटवणाऱ्या मज स्मरती मास्तर शाळा वेताने मज बडवावे मी तसाच बघ थरथरतो ! तू सांग बये मज , काय मी सांगू घरमालकाला ? गाण्याचा तव जल्लोष माझ्यासह किरकिर ठरतो ! ना अजून झाला तंटा ना ताळतंत्रही सुटले तुज ' गाऊ नको ' म्हणताना गाण्यातच सामील होतो !!

याद्या 1414
प्रतिक्रिया 4

ही माझी मिपा वर पहिली प्रतिक्रिया आहे. सही सही अ ही कविता . मी सर्वान्ना फोरवर्ड केली. :-)