(प्रतिसादांचे........)
उदंड झाले वार प्रतिसादांचे
किती गेले घातवार प्रतिसादांचे
कुस्करणारे, कुजके बोलणारे
कसे असे व्यवहार प्रतिसादांचे
तू प्रेमाने कुरवाळले कवितेला
शब्द शब्द टोचले प्रतिसादांचे
मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर
उठले बाजार प्रतिसादांचे
थडगे माझ्या लाडल्यांचे अन,
गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे
मोक्ष मिळावा निदान फाट्यावर
फोफावले आजार प्रतिसादांचे
-- फुकटरंग
काव्यरस
मिसळपाव