Skip to main content

(प्रतिसादांचे........)

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 20/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
उदंड झाले वार प्रतिसादांचे किती गेले घातवार प्रतिसादांचे कुस्करणारे, कुजके बोलणारे कसे असे व्यवहार प्रतिसादांचे तू प्रेमाने कुरवाळले कवितेला शब्द शब्द टोचले प्रतिसादांचे मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर उठले बाजार प्रतिसादांचे थडगे माझ्या लाडल्यांचे अन, गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे मोक्ष मिळावा निदान फाट्यावर फोफावले आजार प्रतिसादांचे -- फुकटरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1288
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अरुण मनोहर साहेब, लय बेस. एक मारा लेकिन सॉलिड मारा . मस्त. माझा तुम्हाला नमस्कार व सलाम. कविता किंवा तिखट व्यंगात्मक कविता खरच उत्तम व भल्या भल्यांची पार वि़केट उडवणारी आहे.

अरूणजी, विडंबन उत्तम आहे, पण मूळ गझलेचं वृत्त वापरलं असतं तर आणखी मजा आली असती.

मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर उठले बाजार प्रतिसादांचे थडगे माझ्या लाडल्यांचे अन, गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे.......मस्तच....