गणपती गेले (एकदाचे) गावाला !
लेखनप्रकार
गणपती गेले (एकदाचे) गावाला !
गणेशोत्सव संपला न भो एकदाचा. व्हय असंच म्हणायची यळ व्हो
पुणेकरांना याचा लै च राग येईन. पन तेचं काय मी मनाव घेत न्हाय.
पन आज कसं सकाळ सकाळ शांत वाटतय.
गेले धा दिस लई जाम झालं व्हत.
या धा दिसात आमच्छ्या मंडळानी लई कामं केले.
लोकांकडून लई पावत्या फाडल्या. पुण्याचे लोक लई डेंजर बरका… पैशे देताच न्हाईत.
(महाराष्ट्र ब्यांक कॉलनी मध्ये पैसा माघायची टाप न्हाय आमची)
पन केले जमा २ एक लाख. हा पन खर्च पन केला बरका.
काल संध्याकाळ पासून राती २ वाजेपथूर एक ढोल ताशा पथक अन्ह्ल. तेन्ल्हाच अर्धा लाख गेले.
नेक्ष्ट इअर साठी पैशे नको का ? मंग त्यासाठी पंचवीस हज्जार ब्यांकेत ठीवायचे अस ठरल.
संपला हिशोब …
(कोनतरी म्हनलं बाकी २५ च काय? म्हनलं कमी नको पडायला, आपनंच ढिले २५ रुपै, पावती पण नाय घेतली)
निवडणुका आल्यात…. चालायचचं
बाकी लई छान झालं सम्द. नेक्ष्ट इयरला बाप्पाला सोताच्या स्कार्पिऊ मधून न्हेणार आपन असं ठरलंय.
वाचने
3769
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
थांबा जरा. नवरात्र येतंय.
In reply to थांबा जरा. नवरात्र येतंय. by इनिगोय
आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून.
In reply to आचार संहिता ( इंग्रजीत इमर्जन्शी ) लागायची हाय उद्या पासून. by सवंगडी
फार बोललात
In reply to फार बोललात by डांबरट
धन्यवाद पण ….
सहमत. डोके उठले होते आवाजाने.
आता माझा वर्षातला सर्वात आवडता पंधरवडा येणार.
चांगलंय
In reply to चांगलंय by पैसा
बर वाटलं.
मुरलेला
In reply to मुरलेला by तिमा
जाळायचे काम नाही… !
काल लैच नाचल्यालं दिसताय !!
In reply to काल लैच नाचल्यालं दिसताय !! by सूड
नाचलो नाय व्हो
योग्य बोललात.....
In reply to योग्य बोललात..... by मुक्त विहारि
काय राग धरायचा?