मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(डोसा इथला संपत नाही)

धन्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही. मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल.

वाचने 7416 वाचनखूण प्रतिक्रिया 49

पैसा Wed, 10/01/2014 - 18:55
मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D

In reply to by खटपट्या

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 07:29
१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.

In reply to by खटपट्या

बॅटमॅन Tue, 10/07/2014 - 16:59
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!

सूड Wed, 10/01/2014 - 19:08
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.

विटेकर Wed, 10/01/2014 - 19:26
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.

In reply to by जेनी...

धन्या Wed, 10/01/2014 - 19:52
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.

In reply to by धन्या

सूड Wed, 10/01/2014 - 19:54
छ्या राव!! नदीपलिकडे असलात म्हणून काय झालं, पुण्यात राहता हे जाणवण्याइतपत तरी धारदार होऊ देत शब्द!! ;)

In reply to by सूड

धन्या Wed, 10/01/2014 - 20:00
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)

In reply to by जेपी

धन्या Wed, 10/01/2014 - 19:57
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(

In reply to by धन्या

सुहास.. Wed, 10/01/2014 - 20:48
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)

विवेकपटाईत Wed, 10/01/2014 - 21:11
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.

प्रचेतस Wed, 10/01/2014 - 22:03
=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.

In reply to by मुक्त विहारि

धन्या Wed, 10/01/2014 - 23:35
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.

चौकटराजा गुरुवार, 10/02/2014 - 05:59
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते

कंजूस गुरुवार, 10/02/2014 - 06:36
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 06:50
विडंबन छान जमले आहे. बाकी यामुळे एका नव्या दभाउ साखळी बद्दल ठाऊक झाले - http://mankardosacentre.com/.