( मी लिहिल्यावर पळुनी जातील -- )
प्रेरणा - पुष्कराज यांची कविता मी गेल्यावर वि़झुनी जातील--
------------------------------------------------------
मी लिहिल्यावर पळुनी जातील
शब्ददीप आकाशी
मी लिहिताना थांबून राहील
शाई तशी पेनाशी
मी लिहिल्यावर प्रतिसादही
कोणी द्यायचे नाही
मी लिहिल्यावर कोणी तळपूनी
उत्तर द्यायचे नाही
मी मी माझे खुळ्या कल्पना
किती काढसी धागे
लिहिल्यानंतर पृष्ठावरती
दोन क्षणांतच मागे
नवलेखांची ही पहा अवस्था
काय होतसे आहे
गमनानंतर कशास वेड्या
नाव आपुले राहे
कौलामध्ये विषय संपला
खरडीमध्ये नाती
लिहून लिहून आज जाहली.
विचारांची माती
तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
लिहिल्यानंतर प्रतिसादतो
कोणी तरी देणार
----------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2157
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगाया . .
>कौलामध्ये
मस्त
मजा
सह्ही
विडंबन आवडलं
मस्त
कविता मस्त
छान.