Skip to main content

विडंबन

[ठेव दरवाजा खुला...]

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 29/04/2009 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना ठेव दरवाजा खुला... पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला मी कसा वाईट ठरलो, सांगतो आता तुम्हा (गोपिनाथाच्या बरोबर जायचो मी चौफुला) दूरदेशी आमचा हा घोळ होतो नेहमी समजतो बाईच आम्ही केशसंभारी मुला जाहले आयुष्य आहे, आमचे बुजगावणे बायको सांगेल तैसे या इथे आता डुला छापकाटा चालला आहे कधीचा हा तिचा एकदा लागेल नंबर याच आशेवर झुला हेच होते शेवटी जे आज माझे जाहले एवढे हासू नका शेकेल तुमचा ही कुला तू विडंबन पाडले आहेस भीषण "केशवा" खैर ना आता, पळाया ठेव दरवाजा खुला

(ठेव दरवाजा खुला...)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 28/04/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा 'ठेव दरवाजा खुला...' ही भूषण कटककर यांची सुंदर गजल! ;) जाहले आहे कठिण, मी भेटणे म्हणजे तुला बेरकी बापुस कधीचा शोधतो आहे मुला! मी सदा वाईट ठरतो, चांगला ठरतो कधी? बंधुराजे गाठ पडता, ठणकतो माझा कुला दूरदर्शन व्हायचे मज तेवढी होती मुभा हलवताना हात दिसली दूरच्या कोणा मुला रोजचा हा सीन, देते पोरगी हुलकावणी मारते फाट्यावरी पण मारते तोवर डुला! छापकाटा चालला आहे नशीबाचा असा वाट का मी बघत राही रातचा लकडी पुला! रोज काटे टोचती जे आज देखिल टोचले का पुन्हा मी हासलो पण आज दिसलेल्या फुला हाय!

(बहु असोत)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 28/04/2009 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥ गगनभेदी माया तरी पडते ती उणी लोभाच्या सीमाही वाढती झणी चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥ प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे रस्ता वा चौकासही नाव मम पुरे "भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥ जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती 'फोडा अन राज्य करा' हीच तर निती धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥ गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो लक्ष्मी, कीर्ती, सत्

फिक्शन - मी त्याला चावलं

लेखक टारझन यांनी रविवार, 26/04/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
सन ३१०२ : मेचा कडक थंडीचा हिवाळा ,सगळी कडे बापे लोक .. आप्पाराव सोपानराव वाघमारे हॉस्पिटलचा परिसर, णर्सोबांची (मेल णर्स) धावपळ !! मॅटर्निटी वॉर्डचा परिसर .... मजला नंबर ४१०, रूम १२: -------------------------------------------------------------------------------------------------------- ऍकिलोप्टस आपल्या पाचव्या डिलेव्हरीसाठी आला होता , अजुन एका डिलेव्हरी नंतर त्याची ओव्हर संपणार होती . ३ वर्षांपुर्वीच ऍकिलोप्टस आणि काळूराम ह्यांचा विवाह झाला होता... आनंदात दिवस जात होते आणि ऍकिलोप्टसची एकेक डिलेव्हरी होत होती .. सगळी सरळसोट गोरी पोरं ?

विडंबन पुर्ण करा

लेखक निशिगंध यांनी शनिवार, 25/04/2009 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गारवा माहीतच असेल ना...... पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. कुणाचे कीती प्रतीसाद काटायचे..

आजही श्वासात आहे.. लागतो काही सुगावा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 21/04/2009 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रसन्न शेंबेकर यांची सुरेख रचना पाहतो श्वासात कोठे.. लागतो काही सुगावा आजही श्वासात आहे लागतो काही सुगावा काल तू होतीस प्याली सांगतो आहे पुरावा अंगणापर्यंत आता वारुणीचा वास जातो काल मी बहुतेक गेलो ह्याच वाटेने असावा? ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का? "सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा ती म्हणाली "माग ना रे... तू, मला सोडून काही" (ग्लास तू भरशील तेव्हा चेहरा माझा दिसावा!

((बेत आहे..!))

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/04/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
उपटसुंभाचे 'बेत' वाचून आम्हालाही पूर्वीचे बेत आठवले, काही आमचे आणि काही दुसर्‍यांचे...;) आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे. आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे. भेटणे मजला पुन्हा ती टाळते नाक्यावरी का मज कळेना योग हा की कटवण्याचा बेत आहे. अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे! टाकली पोटात जेव्हा मी जराशी जास्त फेणी कोण वदले, आज टकुरे सडकण्याचा बेत आहे? रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?

( बेत आहे..! )

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 20/04/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा आज वेगळे भजन गाण्याचा बेत आहे. स्टँड नव्हे स्टेशनवर भीक मागण्याचा बेत आहे. भेटता मजला दानशुर नव्या वळणावरी ह्या आज दोन्ही पायाने लंगडा होण्याचा बेत आहे. संगे माझ्या कशाला इतर भिकार्‍यांनी फेर धरला ही त्यांची चाल की हा जागेच्या भांडणाचा बेत आहे. टाकली कटोर्‍यात जेव्हा लोकांनी जराशी जास्त नाणी देव वदला, आज तुला पिझ्झा देण्याचा बेत आहे. तु भेटलीस पुलाखाली की दोघे वडापाव खाऊ की तुझा आज चायनीज खाण्याचा बेत आहे. रोजच्यासम आज पोलिसा मी लाठी खाणार नाही आज माझाही जरासा आराम करण्याचा बेत आहे. आपला, मराठमोळा
Taxonomy upgrade extras

कोन येतय?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 18/04/2009 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
आरं ह्याऽलू - फोन न्हाऽई उचलत... म्हजी गोधडीतच हायेस. अज्जुक? टाईम झाला तरी कालवान गरम कर. नाहीत मंग खाशील बोलनी समद्यांवानी टुकड्याच्या येळी बोंब मारली म्हनून..
Taxonomy upgrade extras