मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(फिरवतो हात)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाषाणभेदाची चांदरात वाचून आम्हाला आमचा 'चांद' आणि रात आठवली! ;) उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
भांग तो करण्या केस नुरले मी हरलो अन वीग जिंकले न कळे कुणी केली केसांवर मात || १ ||
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
नापितापुढे कळ सोसतो मुश्कील विचारे 'साहेब, केस कसे झाले गुल?' विस्तारता चांद असा दिनरात || २ ||
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
वारे चढले वीगही पडले एका क्षणी सारे अवचित घडले लोका सांगे जणू आज टाकली मी कात || ३ ||
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु || चतुरंग

वाचने 3405 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अभिज्ञ 27/04/2009 - 21:29
रंगा काका, उच्च झालेय विडंबन. :) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

पाषाणभेद 28/04/2009 - 07:35
मी वाटच बघत होतो याची. प्र. के. अत्रेंची आठवण झाली. फक्त तारीख पण टाका खाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)