Skip to main content

विडंबन

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 11/06/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचा http://misalpav.com/node/8127 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 10/06/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो.

(आय विश)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 09/06/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सुवर्णमयीताईंची 'आय विश' ही कविता! ;) मराठी जालावर मोजक्या वर्षांचे नवकाव्य मागे मी वाचत वाचत. पद्यविभागात दिसणार्‍या नवकविता पाहून 'कर्म, कर्म' म्हणत होतो मी. वाचकांना वाचवण्याकरता दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर' डोक्यात आणखी एक कल्पना घेऊन गुळगुळीत कागदावर सुसाट पुढे लिहीत गेला.. मी वाचेस्तोवर एका वाचकावर नवकविता ठेवून ..गेला पुढे . मी धास्तावलो..

काव्य

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 07/06/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे? अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे! 'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती.. रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे! मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण.. चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे! जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या... कोपर्‍या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?

<यज्ञधुनी>

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 29/05/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ह. घ्या... मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून गांजाची वलये सोडतांना जालिंदरबाबा गरजले बम बम भोले बम बम धातुच्छादित वक्ष मिरवत सूक्ष्माग्री शहारे देतांना हसून मॅडोना म्हणाली टोचेल> टोचेल> टोचेल> प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेतांना सजणी म्हणाली "अय्या, हे असं दिसतं?" :''(

थांबुनी येथे जराशी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 26/05/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी मिसळ पाव वर आमच्या स्वताच्या भाषेत लिहायचा हा छोटासा आणी पहिलाच प्रयत्न आहे बघा जमलाय का ते हे कॉपी पेस्ट नाहि बर नाहि तर उगाच ओरडाल ( सहकार्य मार्गदर्शन परिकथेतील राजकुमार ह्यांचे आहे) आमची प्रेरणा थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा हि आहे थांबुनी येथे जराशी दारु पिवुन जा आणि ना प्यायचे तर वळण हे टाळून जा बांधलेल्या ह्या बारच्या टेबलाला हळूसा स्पर्श तू करुनी जा अन्यथा सार्‍या स्मृतीना तु विसरुन जा टेबलाच्या वरती बाटली जागते तव चिंतनी संपवाया टेबलावर सावली ढाळून जा जोवरी होती भरली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली तू पिण्याला उशिर
Taxonomy upgrade extras

(चंपी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 26/05/2009 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
देवाशपथ! शरदिनी ह्यांची 'चंपी' वाचून माझी अक्षरश: चंपी झाली आणि मग बधिरल्या मेंदूला काही सुचेना. पण काय चमत्कार थोड्याच वेळात आमच्या भादरलेल्या मेंदूतून हे स्फुरले!

लडखडगीत

लेखक चतुरंग यांनी रविवार, 24/05/2009 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
ॐकारचे 'गडबडगीत' आवडले. म्हटलं निवडणुकी दरम्यान भरपूर कार्य केलेल्यांचा 'श्रमपरिहार' सुरु असेल तर काय गाणं म्हणतील बरं? ;) डोला डोला डोला, डोला डोला डोला ताडी प्या की, कशाला हवी टकीला? डोला डोला डोला, डोला डोला डोला चकण्याला चार उकडी अंडी सोला? डोला डोला डोला, डोला डोला डोला खिसा कधी कापला, हात कुठे गेला? डोला डोला डोला, डोला डोला डोला ओबेरॉय, ताज, झमझम(?), गुत्त्याला डोला डोला डोला, डोला डोला डोला कोण देई रोख, कोण उधार बोला? चतुरंग

(काळजी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 22/05/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भटकताना आपल्या आनंदयात्री साहेबांची 'काळजी' ही सुरेख गजल वाचली आणि दूरदर्शनवरचे गाण्याचे कार्यक्रम ऐकताना मला समस्त प्रेक्षकांची वाटणारी काळजी अचानक आठवली! ;) गायचा आहे तुला का राग हा चंपाकळी त्या बिचार्‍या तबलजीचा जायचा आहे बळी! जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे हाय!

प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 22/05/2009 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम रचना पाहून वादळाला झाला पसार नाही प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही? गेले अनेक वाचक सांगून रोज मजला पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही! कवितेत रोज लिहितो मी काहणी 'मनोहर' वृतात खरडले पण प्रतिसाद फार नाही! कविता करीत जातो कडवी पाहत नाही हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ? थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही मी का न बडबडावे प्रस्थापितांप्रमाणे? मी शाहजोग आहे! करतो विचार?