वाचणार्याची रोजनिशी
सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते.
मिसळपाव
"अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा" हे विष्णुशास्त्री व कृष्णशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांनी (यातील वडील कोण व मुलगा कोण, हे विसरलो - कृपया सांगावे) अनुवादित केलेले पुस्तक माझ्या लहानपणी घरात होते. ते नेहमी वाचायचो. फारच अद्भुत वाटायच्या त्या गोष्टी. मुख्य म्हणजे त्या आवृतीत कुणा इंग्रज चित्रकाराची फार छान चित्रे होती.
मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या.घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे.
पत्रकारिता करत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपर्यात फिरण्याची संधी मिळाली.प्रत्येक वेळेला वेगळा रंग ,वेगळा आशय जाणवला.