Skip to main content

वाङ्मय

मराठीतील पहिली गझल

लेखक शरद यांनी मंगळवार, 12/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतली पहिली गझल डॉ. बिरुटेसरांनी सांगितले म्हणून मध्वमुनिश्वर व अमृतराय यांची एकदमच ओळख करून देण्याचा विचार होता. पण त्या आधी अमृतराय यांचा एक विशेष नमुद करावासा वाटतो. हा मराठीतला पहिला गझलकार. इतके दिवस हा मान मोरोपंत पंडितांना दिला जात होता. त्यांची " रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी " ही पहिली गझल मानली जात होती. त्यावरून छंद-- रसना जाती असे नावही पडले. पण अमृतराय (१६५८-१७५३) हा मोरोपंतांना (१७२९-१७९४) ज्येष्ठ असल्याने त्याची " जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावे " हीच मराठीतली पहिली ज्ञात गझल म्हणावयास पाहिजे. मला स्वत:ला या छंद, जातीत काही फारसा रस नाही.

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.

हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 01/07/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नाडीग्रंथांवर अनेकांनी बरेच लिखाण दोन्ही बाजूनी केले आहे. या धाग्याने नाडीग्रंथांचे प्रात्याक्षिकाचा अनुभव घेणाऱ्यांसाठी माहिती.... ....आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात सायंकाळी ६ वाजता भाषण आहे. त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. इच्छुकांनी नोंद घ्यावी. मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर धागा काढून टाकावा.

तुका जातो वैकुंठाला

लेखक यकु यांनी शनिवार, 25/06/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

यू टू, क्रान्तिताई?

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 16/06/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे.

येस ,वी आर ...

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्‍या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ...