Skip to main content

वाङ्मय

जलेबी बाई...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 12/08/2011 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबीबाई... आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...” तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार! तर अशी ही जिलेब्यांची पाककृती.

पुस्तकविश्व: लहानपणीचे मित्र-मैत्रिणी

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/08/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुवि सुरू झाले आहे सुदैवाने मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. आणि एकत्र कुंटुंबातील त्यावेळी एकमेव लहान सदस्य या नात्याने प्रत्येकाकडून हक्काने कोणती ना कोणती पुस्तके मिळायचीच.टिव्ही मर्यादित असल्याने आमचे अनेक हिरो-मित्र-मैत्रिणी आम्हाला या पुस्तकांनीच दिले. काल शाळेतल्या काही मुलांची कार्टुनमधल्या पात्रंबद्दल चाललेली बडबड ऐकली आणि मलाही माझ्या लहानपणीच्या अश्याच गप्पांची आठवण झाली.

ब्राऊ..७..

लेखक गवि यांनी बुधवार, 10/08/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
3

श्री दीपलक्ष्मी ( आंतरराष्ट्रीय्)ऑगस्ट २०११

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/08/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच शिकागो येथे भरणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ अधिवेशनानिमित्त काढलेला श्री दीपलक्ष्मी आंतरराष्ट्रीय ( ऑगस्ट २०११) चा अंक हातात आला. आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो अथ तो इती वाचून काढला. अंक वाचताना एक समाधान मिळाले त्याचबरोबर थोडा अपेक्षा भंगदेखील झाला. अंक आंतररष्ट्रीय आहे ही एक उत्सुकता होतीच . भारताबाहेरील मराठी लोक काय लिहीत असतील या बद्दल कुतुहल होते. नाना पाटेकर , गिरीश कुबेर , अनंत सामंत सुप्रीया विनोद( सुप्रीया मतकरी) यांच्या लेखांची रेलचेल होती. अंकातील लेख सुंदर आहेच.

लेखक व समिक्षकांतील परस्पर नातेसंबंध

लेखक प्रदीप यांनी रविवार, 07/08/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन येथून प्रकाशित होणार्‍या 'फायनॅन्शियल टाईम्स' च्या ह्या शनिवारच्या अंकात फ्रान्सिस व्हीन ह्या लेखक- समीक्षकाचा, लेखक व समीक्षक ह्यांच्यातील नातेसंबंधाविषयावर एक सुंदर लेख आला आहे. अलिकडेच तेथील हायकोर्टाने सेरा थॉर्न्टन ह्या लेखिकेस, तिच्यावर केलेल्या एकाच टीकात्मक लेखावरून, ६५,००० पाँडाची नुकसान भरपाई बहाल केली. सदर टीकात्मक लेख डॉ. थॉर्न्टन ह्यांच्या 'Sevena Days in the Art World' ह्या पुस्तकावर, लाईन बार्बर ह्यांनी लिहीला होता. हा कोर्टाचा निकाल, फ्रान्सिस व्हीन ह्यांच्या लेखाची प्रेरणा आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

लेखक सुकामेवा यांनी सोमवार, 01/08/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 27/07/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात.

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 26/07/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..

विश्वासाचं सार्थक

लेखक प्रास यांनी सोमवार, 25/07/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही.

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.