Skip to main content

वाङ्मय

बंडुचा धंदा.. :)

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 13/02/2012 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक.. नेहमीप्रमाणे दर ५ सालांनी महापालिका निवडणुका येतात, तशा त्या यंदाही आल्या. महापालिका निवडणुका म्हणजे बंडुचं ५ सालातून एकदा भरघोस उत्पन्न मिळण्याचं पिक. या वर्षीही बंडुने पेरणी-लावणी-कापणी म्हणून जे काय करतात ते सारं केलं आणि त्याला पुन्हा एकदा ५ लाखांचं भरघोस उत्पन्न मिळालं आणि बंडू आज सकाळीच कोकण रेल्वे पकडून चाराठ दिवसांकरता बायको आणि लेकीला घेऊन गोव्याला मस्त मजा करण्यासाठी रवाना झाला! :) बंडु आपल्या विभागात, विशेष करून विभागातल्या 'अबक' समाजात तसा फेमस माणूस. सुशिक्षित, सगळ्यांना मदत करणारा, नेहमी हसतमुख असा.

(गिरनार पर्वतावर रंजिताची - गुरूंशी भेट)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/02/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सदरच्या विडंबनाकरता तामिळनाडूमधील काही महिन्यांपूर्वी सिने अभिनेत्री रंजिता आणि स्वामी नित्त्यानंद यांच्यातील गाजलेल्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. या स्कँडलबाबत अनेक संकेतस्थळांनी आणि हिंदी-इंग्रजी व सर्व दाक्षिणात्य वाहिन्यांनी काही काळ सातत्याने प्रकाश टाकला होता. सबब, या विडंबनाकरता आणि केवळ मौजमजा म्हणून इथेही त्या स्कँडलचा आधार घेण्यात आला आहे. मिपा मालक-चालक आणि संपादकवर्गाची त्याबाबत हरकत नसावी! -- तात्या.

आणि अनंतकालाची माता असते

लेखक शरद यांनी सोमवार, 30/01/2012 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि अनंतकालाची माता असते. उपगुप्त हा नगरश्रेष्टीचा मुलगा. गजांत लक्ष्मी घरांत वास करत होती. उधळावयाला, छानछोकी करावयाला कशाचीच ददात नव्हती. तो तरुणपणीच वासवदत्तेच्या सहवासात आला. ही शहरातील यौवनसंपन्न, लावण्यखनी, कलांचतुर गणिका. दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले. गोष्टीचा सुखांत शेवट व्हावयास काहीच अडचण नव्हती. नव्हती, पण एक अघटित घडले. शहरात गौतम नावाचा एक मुनी आला. त्याने बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करून जीवनाचा "अर्थ" शोधून काढला होता. त्याच्या प्रवचनांना अलोट गर्दी लोटत होती. गंमत म्हणून उपगुप्तही एक दिवस प्रवचनाला गेला. आणि त्यांतच अडकला.

स्फुट: रचना!

लेखक राघव यांनी गुरुवार, 19/01/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही सुंदर रचना कशी घडत असेल? बर्‍याच दिवसांपासून उगाच हा प्रश्न मला पिडतोय. :) तसं तर रचना = पदार्थ, शिल्प, रेखाचित्र, छायाचित्र, गद्य-पद्य लेखन, संगीत.. पण सोबतच एखादे सुंदर घर, एखादी आठवण, एखादं मैत्रीचं अतूट नातं, एखादी अप्रतीम - संपूच नये असं वाटणारी संध्याकाळ.. असंही बरंच काही म्हणता येईल.. नाही? मग विचार केला, कोणतीही रचना सुंदर केव्हा नसते? सहज उत्तर येतं.. जेव्हा ती आवडत नाही! का आवडत नाही? हृदयाला भिडत नाही म्हणून. म्हणजे कोणतीही रचना सुंदर तेव्हा होते जेव्हा ती हृदयाला भिडते.

विनोबा भावे-अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत अध्यात्मातील वन लायनर्

लेखक कापूसकोन्ड्या यांनी सोमवार, 16/01/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.