Skip to main content

वाङ्मय

एक आठवण, धुळीतली...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 07/06/2011 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली. पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं.

वसंतकाव्यमाला कट्टा वार्तांकन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 31/05/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आधी ठरल्याप्रमाणे रविवारी २९ मे २०११ रोजी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. 'मी मराठी' चे राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. नेहमी जालावर शब्दरुपाने भेटणार्‍या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, कशा बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर आम्ही स्थानापन्न झालो. जुजबी गप्पा झाल्या.

अर्धसत्य..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 26/05/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता - दिलिप चित्रे अनुवाद - तात्या अभ्यंकर. अर्ध सत्य.. चक्रव्युहात घुसण्यापूर्वी कोण होतो मी, कसा़ होतो हे मला माहीत नसेल.. चक्रव्युहात घुसल्यानंतर माझ्या आणि चक्रव्युहादरम्यान फक्त एक जवळीक होती जीवघेणी - हे मला कळणारच नाही चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर भले ही मी मुक्त होईन.. तरीही चक्रव्युहाच्या रचनेत काहीच फरक पडणार नाही.. मरू की मारू?

शाप

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 21/05/2011 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच जवळच्या माणसाने माझ्या मनाच्या हळव्या-दुखर्‍या वर्मावर वार केल्यावर..... यथावकाश मी अंतर्मुख झालो. या सगळ्या वेदनांचे पुढे काय होत असेल ? त्या कुठे जात असतील ? माझ्या मनाच्या भिंतींवर, जागोजागी लटकणारी चित्रं मला आठवली.. त्यातली कुरुप बीभत्स चित्रं उघडीनागड्या लावसटींसारखी माझ्यावर धावुन येत होती, जणु त्यांचेच अस्तित्व त्या चार भिंतीत राज्य करते असे ठसवायचा प्रयत्न करत होती. वेदनांची अशीच कुरुप चित्रे होत असावीत.

गजर (Journey of the soul)

लेखक गणेशा यांनी बुधवार, 18/05/2011 07:18 या दिवशी प्रकाशित केले.
गजर (Journey of the soul) लेखक-दिगदर्शक : अजित भैरवकर कलाकार : चिन्मय मांडलेकर, सुखदा यश, एडवर्ड, सुहास शिरसाट --- १८ दिवस चालणारी पंढरीची वारी आणि ज्ञानेश्वरीचे १८ अध्याय यांचा योग्य संगम (नाविन्यपुर्ण विचार) मला खुपच आवडला .. या एका कल्पनेसाठीच लेखकाला सलाम, अजोड परिश्रम.. वारीच्या खरा अनुभव .. खर्‍या वारीमध्ये १८ दिवस केलेले शुटींग.. वारीतील प्रसंग.. रिंगण आणि इतर प्रथा... आणि एका माणसाच्या जीवनात वारीमुळे होणारा योग्य बदल हे ह्या सिनेमाच्या मुख्य बाजु वाटतात .. त्यातच वारीतल्या शेतकर्यांच्या थोड्याश्या कहाण्या..

रस्त्यावरचे सस्ते बालगंधर्व...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/05/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालपरवाच जालावर खालील फोटो पाहायला मिळाला आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. एच एम व्ही च्या याच मालिकेतली एक फिरती संगीत थाळी (Record) माझ्याकडे आहे त्याची आठवण झाली. मुंबैचा चोरबाजार. म्हणजे गोल देउ़ळ, भेंडीबाजारचा भाग. या चोरबाजाराबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने आणि डिट्टेलमध्ये. इथे काय काय मिळू शकतं, त्याचे भाव काय असतात, भावाची घासाघीस कशी चालते, अवचित गुंडगिरी-दादागिरी कशी चालते ते सगळं मी अनुभवलं आहे.

बालगंधर्व...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/05/2011 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत. "नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.." "हो, चालेल.

पिउनी अमृत घेउनी संचित...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/04/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याकरता मिपाचे डॉ रमताराम यांचे मनापासून आभार.. पाखरा जा.. (येथे ऐका) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे.. 'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं.