अन्नपुर्णा
आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले
आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र !