वाङ्मय
शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.
कविता व भावगीत
मागील एका लेखात विषय आला होता " कविता व भावगीत यात फरक करता येतो का ? आणि तसा फरक असेलच तर तो कशामुळे उद्भवतो ? आता हे शक्य आहे की चांगला कवी सुरेख भावगीत लिहू शकेल आणि श्रेष्ठ भावगीतकार सुरेख कविताही लिहून जाईल. दोन उदाहरणे म्हणजे मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके. उलटे उदाहरण म्हणजे आरती प्रभूंचे. त्यांच्या अनेक सुन्दर कविता रसिकांच्या मनात घर करून असतात पण भावगीत ? लक्षात आले का मला काय म्हणावयाचे आहे ? पण हा फरक अधोरेखित करावयास आज एक छान उदाहरण देतो.
काळ साधारणत : साठ एक वर्षांपूर्वीचा.
न देखे रवी
न देखे रवी, ते देखे कवी !
कवींनी आपले कौतुक करण्यासाठी हे खरडले का ? शक्य आहे.कौतुक इतर कोण करणार हो ? कुठल्याही साहित्य संमेलनाला जा. कवी संमेलनाला तुडुंब गर्दी. पण समाजवादी पक्षात जसे नेते जास्त.. अनुयायी कमी, तसे इथे कवी जास्त, ऐकणारे कमी. असो. मी आज कवितांबद्दल लिहणार नाही.(कोणी हु s s श्श्य.. केले ?) पण ही कविता करणारी मंडळी कवितेतर लिखाण करतात तेव्हा खरी बहार येते. शांताबाई शेळके, प्रवीण दवणे,वसंत बापट वगैरे लोक जेव्हा ललित,स्फुट लेखन करतात तेव्हा खरी मजा येते. येथे गण-मात्रांचे, लांबी-उंचीचे बंधन नसाल्याने कसे ऐसपैस लिहतात. तशात गप्पांची आवड असेल तर मोकळेच सुटलेले असतात.
एका अस्सल मर्दाची कहाणी
बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला.कवी मेघवेडाची 'उरा'तली सर !
'उरा'तली सर ! - http://misalpav.com/node/22159
***
'नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर' अशी सुरुवात करुन नावातच मेघ आणि त्याचे वेड सामावलेला कवी जेव्हा पावसावर लिहितो तेव्हा पावसाने जशी धरणी तृप्त होते तसे रसिक मन तृप्त होणार याची खात्री असते आणि मग उरतो केवळ कवीच्या लेखणीतून झरझर उतरलेल्या काव्यामृताचे पान करण्याचा एक उपचार. अमृत मिळणार हे आधीच माहित असते आणि तसेच घडते.
'उरा'तली सर!
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर!
मिसळपाव
