Skip to main content

वाङ्मय

'सुशिं'ची झपाटलेली दुनिया!

लेखक अजिंक्य विश्वास यांनी रविवार, 08/09/2013 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच यशस्वी झालेल्या 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दैनिक ’दिव्य मराठी’ मध्ये ’रसिक’ पुरवणीत आलेले सम्राट शिरवळकर यांचे २ अप्रतिम लेखांपैकी १ लेख मी येथे स्वत: लेखकाची परवानगी घेऊन देत आहे, आणि सोबतच ’समग्र सु.शि.’ ची संक्षिप्त पण महत्त्वाची माहिती. (संदर्भ- दैनिक ’दिव्य मराठी’ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-duniyadari-movie-based-on-b… ) सोबत सुहास शिरवळकर साहित्य आणि त्याविषयीची चर्चा यामध्ये रस असलेल्या वाचकांसाठी फेसबुक ग्रूपची लिंकसुध्दा जोडत आहे.

विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

लेखक पैसा यांनी शनिवार, 07/09/2013 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
विंचुर्णीचे धडे गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे.

आम्हां घरी धन.....(३)

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/09/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..

स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा

लेखक उद्दाम यांनी बुधवार, 04/09/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली. मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय. आणि एक दिवस मग ठरवलं. "आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. " होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी? .. स्प्लेंडर विकली. त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

छगनलालांचे सापळे (भाग ५)

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 24/08/2013 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197 त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी.

काय चुकल???/ शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 17/08/2013 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पोलिसांनी तिथे छापा मारला, उच्च शिक्षित परिवारांची प्रतिष्ठित शाळेत शिकणारी १५-१८ वयोगटातील पोरांना नशेच्या त्या अवस्थेत पोलिसांनी पकडले. त्यांना दम देऊन सोडण्यात आले. त्यात सोनल ही होती. सोनलची आईचे बडबडने सुरु होते, अशीच वागली तर कुठे तोंड दाखवायला ही जागा उरणार नाही... सोनल ओरडली, बSSस, तुझे प्रवचन ऐकून कान पिकले माझे! काय केलं मी, हं थोडी विस्की घेतली, मित्रां बरोबर मजा केली, एवढेच नं. घरात काकटेल पार्टी होते, आणि तुझे डान्स मॅनर, त्या दिवशी उघड्या पाठीचे स्लिव्हलेस घालून, सर्वांसमोर बासच्या गळ्यात-गळे घालून नाचत होती आणि त्याचा हात... खटाक... सोनल किंचाळली.

शिव श्रावण आणि आपण

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 13/08/2013 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सज्जनहो, सध्या श्रावण महिना चालू आहे सर्व साधकांसाठी पर्वकालच जणू या महिन्यात कुठल्याही देवतेची केलेली साधना अधिक फलदायी असते. परंतु त्यातल्या त्यात हा श्रावण महिना भगवान शिवशंकरासाठी खूपच महत्वाचा मानला जातो . नेहमी म्हणजे रोजच्या जीवनात प्रत्येकजण 'जो आस्तिक आहे तो' सकाळी स्नानानंतर पूजा जमली नाही तर देवाला नुसता नमस्कार का होईना करूनच घराच्या बाहेर पडतो. परंतु श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या या कृतीत जास्त सुधारणा होत असते. म्हणजे उपवास किंवा ठराविक दिवशी देवाला जाऊन येणे आदी. जमले तर एखाद्या सद्ग्रंथाचे वाचन आणि दिवसातून जमेल तसे देवाचे नामस्मरण अश्या गोष्टी आपोआपच होतात.

पुस्तके सुचवा ना !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/08/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे. पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते. राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे. शतदा प्रेम करावे - अरुण दाते