Skip to main content

वाङ्मय

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

Published on बुधवार, 06/02/2013 प्रकाशित मुखपृष्ठ

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

याद्या 1364

अक्षम्य हेळसांड (दुर्लक्ष्) CRIMINAL NEGLIGENCE

Published on गुरुवार, 31/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
ही मी विशाखापटणम येथे कल्याणी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट (१९९८) आहे. आमचा एक पंजाबी lab technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) होता. त्याच्या बायकोने एका मतीमंद मुलाला १९९० मध्ये पंजाबातील गावात जन्म दिला आणि त्यात तिचे दुर्दैवाने देहावसान झाले.त्याचे वय तेंव्हा २४ वर्षे होते त्या तंत्रज्ञाने नंतर या मुलाची देखभाल करण्यासाठी आणि परत पुढील आयुष्यासाठी दुसरे लग्न केले.दुसऱ्या बायकोपासून त्याला दोन मुले झाली. ही दोन्ही मुले व्यवस्थित होती. हे मतीमंद मूल जसे वाढू लागले तसे तसे त्याच्या अविकसित मेंदूचे कार्य अनियमित होऊ लागले. आणि त्याला अपस्माराचे(fits) झटके येऊ लागले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4693

सुनिता

Published on मंगळवार, 22/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
ही १९८७ च्या हिवाळ्यातील गोष्ट आहे.हि १०० % सत्य घटना चक्षुरवै सत्यं आहे मी कमांड हॉस्पिटल पुणे मधल्या अति दक्षता विभागात २४ तासाच्या आपत्कालीन कामाला(emergency) होतो. साधारण रात्री ११ वाजता बाह्य रुग्ण विभागातून(casualty) एक बेशुद्ध रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात आणले.त्याच कोणताही आगापिछा माहित नव्हता. वय साधारण २३-२४ असेल .अंगावर पँट शर्ट आणि स्वेटर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4713

विसरभोळा

Published on सोमवार, 21/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
[ओ. हेन्री यांच्या 'द रोमान्स ऑफ द बिझी ब्रोकर' वर आधारित] हार्वे मॅक्सवेल एक यशस्वी शेअर ब्रोकर होते. पीचर त्याच्या कार्यालयात स्वीय स्वचिवाचे काम करत होता. तो गुरूवारचा दिवस होता. सकाळी साडेनउला मॅक्सवेल नेहेमीप्रमाणे घाईघाईने आपल्या स्टेनोबरोबर ऑफिसमधे आले. स्टेनोचा बदललेला आविर्भाव बघून एरवी मख्ख असणार्‍या पीचरच्या चेहर्‍यावर एक क्षण आश्चर्याचे भाव नकळत उमटले. एका क्षणार्धात "गुड मॉर्निंग, पीचर" म्हणत मॅक्सवेल चित्त्याच्या चपळाईने आपल्या टेबलाकडे झेपावले. ग्राहकांची पत्रे आणि तारा यांचा एक मोठा ढीगच त्यांची वाट बघत होता. स्टेनो आपला रिवाज सोडून अजूनही मालकिणीच्या रूबाबात वावरत होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5377

<अवाक्षर>

Published on सोमवार, 21/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
कोणालाही न पटणार्‍या, पण लिहीलेल्या लेखांची ही स्टोरी. न पटता (किंवा पटण्याची शक्यता नसताना) ते कशाला लिहीले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. ते पटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा प्रतिसादतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायचं नाही.... फक्त लिहायचं. लेखनाचा उद्देश ठाऊक नाही पण लिहायचं,... वेड्यासारखं लिहायचं. आजूबाजूच्या मिपाकरांना जुमानतंय कोण? शब्दाशब्दातून 'मी'पण त्यात लॉजिक कुठले बोंबलायला ? आपलंच मिपा म्हटल्यावर झक मारत वाचणारच आणि लोकं चुका काढतायत म्हटल्यावर आपलंच खरं न करून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, अतार्किक लिहायच....फार मजा येते.

याद्या 3103

पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ...

Published on शनीवार, 19/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त... आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल. अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय... ... बघा, की आम्ही अनंत काळापासून आमचं काम इमाने-इतबारे करत आलो. पूर्वी इतर पशुपक्षी खूप असले, तरी मनुष्यप्राणी फारच कमी होते. दिवसभर शिकार वा शेतीची कामं करून सूर्य मावळताच झोपून जायचे. त्यामुळे उचापती कमी, हिशेब ठेवणं सोपं.

याद्या 52373

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

Published on सोमवार, 14/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

याद्या 18793

अनुत्पादक काम

Published on सोमवार, 14/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
मी डिसेंबर १९८८ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात).
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7228

झटपट न्याय

Published on शनीवार, 12/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
हि मी विशाखापट्टणंम च्या नौदलाच्या रुग्णालयात(कल्याणी नावाच्या) काम करत असतानाची गोष्ट आहे. तेथे नौदलाचे संगत नावाचे केंद्र मतीमंद मुलांसाठी चालवले जात होते. आम्ही तेथे त्या मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गेलो होतो. एक १५ वर्षाची शारीरिक वाढ झालेली पण मानसिक दृष्ट्या मंद अशी मुलगी होती.तिला कावीळ झालेली आढळली म्हणून पुढील रक्त तपासणी केल्यावर तिला hepatitis b आहे असे आढळले. हि कावीळ रक्तातून होणारी होती.पण त्या मुलीला रक्त दिले गेल्याचा कुठलाही पुरावा नव्हता.मग पुढील तपासणीत एक भयानक गोष्ट उघडकीस आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5399

विक्रांत वरील किस्सा

Published on शनीवार, 12/01/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
मी विक्रांत या विमानवाहू नौके वर २ वर्षे(१९९०-९१ ) डॉक्टर म्हणून कार्यरत होतो.तेंव्हाचे प्रसंग खाली देत आहे . विक्रांत वरील आयुष्य फार गमतीचे होते.१९६१ मध्ये भारतीय नौदलात सामील झाल्यापासून ती पूर्ण वेळ समुद्रात उभी असल्याने नौकेवर गंज पकडणे प्रचंड प्रमाणात असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7082