थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय.
मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक.
किंवा कॅरम खेळणाऱ्या तरबेज लोकांचा खेळ बघणं पर्वणी असते. त्यांचा गेम प्लॅन, स्ट्रोक्स च नियंत्रण वगैरे गोष्टी आकर्षक असतातच पण मला मोहात पाडते ती गोष्ट थोडी वेगळीच. अनेक वर्षांच्या गॅप नंतर कॅरम खेळायला सुरवात केल्यावर काही काळाने बरी पकड आली खेळावर. अनेकदा अवघड सोंगट्या पण हुकमी घेता येऊ लागल्या.