Skip to main content

स्थिरचित्र

'गिंप' सोबत खेळण्याचा एक प्रयत्न.

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 10/01/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे हे जास्वंदीच्या फुलाचे साधारण छायाचित्र होते. फारसे काही आकर्षक वाटत नव्हते. त्याच्यासोबत गिंप वापरून थोडी छेडछाड केली आहे.
कसे वाटते ते कळवावे. (हे फूल स्वेटर घातलेल्या गणपतीबाप्पाच्या चरणी अर्पण!) - भटोबा

कोकणवारी

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 17/12/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे. तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

सिनेमा पॅराडिसो.. काही प्रकाशचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 25/09/2008 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पॅराडिसो ... इटालियन फ़िल्म... १९९० चे बेस्ट फॉरीन फ़िल्मचे ऑस्कर घेतले या फ़िल्मने... अप्रतिम सिनेमा आहे. जरूर बघा... या फ़िल्मचे काही कॅप्चर्स मी काढले आहेत आणि मी स्वतः मिक्स करून काही फोटो तयार केले आहेत ते इथे डकवतोय....त्यामुळे हा धागा कलादालनात टाकला आहे ... साल्वाटोर नावाचा इटलीतला मोठा सिनेदिग्दर्शक .....३० वर्षांनी तो गावात पुन्हा परतला आहे... त्याच्या लहानपणाची, सिनेमा शिकण्याची, घडण्याची फ़्लॆशबॆक तंत्राने सांगितलेली ही गोष्ट आहे...

ये कौन चित्रकार है ? ... अर्थातच किमयागार निसर्ग

लेखक दिपोटी यांनी सोमवार, 22/09/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
विविध रंगात उमललेल्या या फुलांकडे पाहून कॅमेरा हातात नाही घेतला तरच नवल ! Dutch Iris च्या निरनिराळ्या उपजातींची ही फुले वर्षातून जेमतेम २ आठवड्यांसाठी हा असा आपला पिसारा फुलवतात. या फुलाच्या पाकळ्या अतिशय तरल व मुलायम अशा असतात.

सूर्यास्त

लेखक नीधप यांनी रविवार, 21/09/2008 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो. कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे. कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.

माझी सूर्यग्रहणात काढलेली सूर्याची प्रकाशचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 19/09/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय सकाळी लवकर उठणार्‍या मंडळींपैकी नाही... पण त्या १९ मार्चला ग्रहण दिसणार आणि सूर्य उगवतानाच ग्रहण लागलेले असणार असे काहीसे आदल्या दिवशी वाचलेले होते... लवकर जाग आली आणि खिडकीपुढे जाऊन उभा होतो, सूर्य उगवायचा होता अजून ... आता परत झोपावे की काय अशा विचारात थोडा वेळ आकाशाकडे दुर्लक्ष झालं आणि वर बघतो तो असा तुकडा चावलेला सूर्य दिसला... मला अंदाजच नव्हता की इतका छान आणि ( शीतल..थोडा वेळ का होईना) दिसणार आहे सूर्य ... काही सेकंद डोळे भरून ते दृष्य पाहिलं आणि कॅमेरा आणायला धावलो... हा पहिला फोटो...

एक होता शिंपी (एक छोटीशी गोष्ट)

लेखक मन यांनी मंगळवार, 16/09/2008 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक होतं आटपाट नगर. त्यात होता एक शिंपी. त्यानं नुकताच बापाचा व्यवसाय सांभाळला होता.आणी हळुहळु शिंपी काम सुरु केलं होतं. जीवन त्याचं कसं छान चाललं होतं. नवनवीन,वेगवेगळे कपडे तो शिवत होता. आणि चरितार्थही व्यवस्थित चालत होता. पण एवढ्यात झालं काय की त्याला टोचली एक सुइ. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ. झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी? त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन. पण सुइ म्हणली "मी तर पडले सरळ-सोट्.बोलुन चालुन एक सरळ्-टोकदार सुइ. मी कशाला जाउ वाकड्यात? तुम्ही शिवता तिथं पोचणं, टाके मारणं इतकच तर माझं काम." पण शिंपी काही ऐकेना. त्यानं ठरवलं "देउ हिला हाकलुन.