'गिंप' सोबत खेळण्याचा एक प्रयत्न.
माझ्याकडे हे जास्वंदीच्या फुलाचे साधारण छायाचित्र होते. फारसे काही आकर्षक वाटत नव्हते. त्याच्यासोबत गिंप वापरून थोडी छेडछाड केली आहे.
कसे वाटते ते कळवावे.
(हे फूल स्वेटर घातलेल्या गणपतीबाप्पाच्या चरणी अर्पण!)
- भटोबा
लेखनविषय:
वाचने
4125
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
भटोबा, मस्तच जमलं आहे हे! आणि जिंप वापरल्याबद्दल स्पेश्शल वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
In reply to झक्कास by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>आणि जिंप वापरल्याबद्दल स्पेश्शल वाढदिवसाच्या शुभेच्छा!
:) मी 'जिंप (की गिंप) फॉर विंडोज' वापरतो....
के व ळ अ प्र ति म !!!
- टार्या रंगिला
In reply to झकास ... by टारझन
धन्यवाद...
सही रे भटा. छान दिसतय फूल.
बॅकग्राउंड कृष्णधवल केली आहेस. आणि अजुन काय केले आहेस.
- (घाटावरचा) सूर्य.
In reply to सही रे भटा. by सूर्य
थ्यांक्यू थ्यांक्यू. बाकी प्रोसेसिंगचं म्हणाल तर २-३ गोष्टी केल्यात. पहिलं म्हणजे पार्श्वभूमी कृष्णधवल केली आहे. त्या चित्राचा फोकस फार काही उच्च नव्हता, पार्श्वभूमी पण सगळी फोकस मधे होती, जे मला नको होतं. म्हणून पार्श्वभूमी ब्लर केली.नंतर ह्यू आणि सॅचुरेशन थोडंसं वाढवलं, त्यामुळे फुलाचा लाल रंग थोडा अधिक भडक झाला. लाईटनेस कमी केला त्यामुळे एक डार्क फील आला. आणि मग ह्यू-सॅचुरेशन बदलण्याचा फुलावरील परिणाम नैसर्गिक वाटावा म्हणून फूल पण किंचित ब्लर केलं (गाउशियन ब्लर - ५ पिक्सेल त्रिज्या). एवढं केलं.
फूल छान आहे..
त्याच्यासोबत गिंप वापरून थोडी छेडछाड केली आहे.
म्हणजे नक्की काय केलेत हे कळेल का?
आपला,
(अनाडी) तात्या.
In reply to फूल छान by विसोबा खेचर
>>म्हणजे नक्की काय केलेत हे कळेल का?
धन्यवाद तात्या. गिंप (किंवा जिंप) हे 'इमेज प्रोसेसिंग' साठी वापरले जाणारे एक सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये असल्या गोष्टी करता येतात.
दोन्ही फोटो (प्रोसेसिंग करण्यापूर्वीचादेखिल) दिला असतास तर तुलना करणे सोपे गेले असते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फारसे नाहि आवडले.. हिरव्या ब्याकग्राऊंडवर जास्वंद अधिक खुलली असती असे वाटते..
काळी ब्याकग्राऊंड काहिशी भेसूर वाटली.. मागे झाडे करपल्यासारखे वगैरे!
-(गोंधळलेला) ऋषिकेश
चांगले आहे :)
मी इमेज प्रोसेसिंग वगैरे कधी जास्त केले नाही. फक्त स्वतःचे फोटो कधीतरी केले असतील काँट्रॅस्ट वगैरे करीता.
तुम्ही मूळ छायाचित्रही टाकलेत तर आणखी मजा वाटेल, कसे वाटते ते कळवायला ;)
झकास जमलयं.
भटोबा,
छान केले आहे.
फुलाचे देठ अथवा थोडा खालचा भाग फोकस मध्ये नसल्याने फुल एकदम चिकटवल्यासारखे दिसते. पण तुम्ही केलेल्या रंगसंगतीने तो दोष थोडा झाकला गेल्यासारखे वाटले. रंगसंगती मजेदार.
फुलाच्या मध्यभागातून वर आलेला जो भाग आहे त्याची सावली आपल्या बाजूला दिसते आहे. पण तो मूळ भाग सुद्धा सावलीसारखाच दिसला. काल हे फुल पाहताना मला वाटले की आपण प्रकाश झोत सुद्धा जिंप मध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे मूळ चित्रातली सावली आणि जिंपमुळे आलेली नवी सावली अश्या दोन तयार झाल्या. त्या मला विशेष आवडल्या नाहित. आज पुन्हा पाहता ते तसे नाही असे जाणवले. (कार्यालयातल्या मॉनिटरचे रंग चांगले नसल्यामुळे सुद्धा असेल.)
मागच्या भिंतीचा पांढरारंग सुद्धा जिंपमध्ये थोडा अधिक गडद केला असता अथवा तो भाग अचित्रातून काढून टाकला असता तर बरे वाटले असते. त्या भगाकडे उगिच लक्ष जात आहे.
प्रयोग आवडला.
पुढील प्रयोगास शुभेच्छा !
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
प्रतिसाद चुकून दोनदा आल्याने काढून टाकला.
--लिखाळ.
सर्वांचे प्रतिसाद आणि सूचनांबद्दल आभार.
- भटोबा
झक्कास