तैलचित्र!
आदला दिवस पुर्ण आणि आज दुपार पर्यंत गाडी चालवून चालवून जीव अगदी मेटाकुटीस आला होता. कधी एकदा गादीला पाठ टेकवतोय असे झाले होते. गरम तर इतके होत होते की मुक्कामाला पोहोचल्या पोहोचल्या दोन बीअरच्या बाट्ल्या मागवून घेतल्या आणि त्याचा आस्वाद घेत बगिच्यातील खुर्चीवर निवांत बसलो. बसल्या बसल्या केव्हा डोळा लागला तेच कळले नाही.
हवेतल्या गारव्याने जाग आली आणि डोळे किलकिले करुन जरा बघितले आणि खोलीत धाव घेतली - कॅमेरा घ्यायला. कॅमेरा चालू केला आणि बाहेर आलो तर साक्षात "त्याने" हातात कुंचला धरला होता. समोर डोंगराच्या मधे पाण्याचे मस्त व्यासपीठ उभारले होते.