टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग.
.
1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल. 'अ आ ई, उ ऊ ऊ, मेरा दिल ना तोडो' वगैरे निषिद्ध होतं तिथे हे काय?)
.
पण तारुण्यात प्रवेश केला आणि ह्या गाण्याची महती समजली.
.
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग
.
ए $$ हे $$ आ $$ हा $$ हा $$ हा
हे $$ हे $$ आ $$ हा $$ हा
.
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग
.
हा रिदम ऐकल्यावर ज्याच्या अंगावर शहारे-रोमांच-काटे येत नाहीत असा माणूस विरळा.
.
पिवळ्या-करड्या रंगाच्या अर्धपारदर्शक शिफॉन साडीत, भरलेल्या अंगाची, उंचपूरी, सौंदर्य-मादकता यांचा मिलाफ असलेली, कमनीय शरीराचं देणं लाभलेली, पहिल्या पावसाच्या सरिंनी भिजलेली, कामातुर रविना डोळ्यासमोर येत नसेल तर नवल!
.
तब्बल 25 वर्षे. दोन तप झाले. तरीही काल-परवा ऐकल्यासारखं वाटतंय. अगदी परिपूर्ण गाणं आहे हे. गेयता, नर्तनमूल्य व प्रणय या सर्वांनी ओतप्रोत भरून, ओथंबुन वाहणारा प्रपात.
गाण्यातील शब्द-अर्थ-लय एकदम सुसंबद्ध आहे. संगीतकाराने चढत्या चालीचा केलेला वापरही अप्रतिम.
*ए-हे-आ-हा-हा-हा* ह्या मार्दवात अलकाने आणि त्याचवेळी आपल्या बोलक्या डोळ्यांनी रविनाने कमाल केली आहे. हृदयाची सतत वाढत चाललेली धडधड जाणवणारी. त्यावर कडी केली आहे नृत्यदिग्दर्शकाने. पावसाचा, तिच्या तलम वस्त्राचा, भिजलेल्या केसांचा अन कमनीय बांध्याचा केलेला वापर.
उफ़्फ़्फ़. काय सांगु अन किती सांगु!!
.
त्यावर कहर म्हणजे रांगडा मर्द अक्षयकुमार. तो ज्या सहजतेने तिला कवेत घेतो अन गिरकी मारतो, केवळ अशक्य. अक्षयचं लाजणं देखील सूचक-अर्थपूर्ण आहे.
.
अंधाऱ्या जागेत फटीतुन झिरपत येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांचा, टपकणाऱ्या थेंबांचा, तुटक्या-मोडक्या जिन्याचा आणि सर्वात कहर म्हणजे टेरेसवरील जागेचा, सैरभैर वाऱ्याचा, अमर्याद पावसाचा अन दोन सचेतन कायांचा उस्फुर्त संवाद दिग्दर्शकाने टिपला आहे.
.
रविना ही काही त्याकाळची आघाडीची नटी नव्हती किंवा तिच्या अभिनयाच्या जोरावर (माधुरी-जूही-श्रीदेवी प्रमाणे) सिनेमे हिट करून देत नव्हती. एक मल्टीस्टारर (नसीर-परेश-सुनिल-अक्षय) सिनेमा, त्यात असावी म्हणून घेतलेली नटी.
.
पण जे व्हायचं तेच झालं. एक अजरामर कलाकृती घडली. खुद्द डायरेक्टरने देखील विचार केला नसेल इतकं जुळून आलेलं समीकरण आहे हे गाणं.
.
ह्या गाण्याची फ्रेम-न-फ्रेम, अगदी अक्षय छत्री हातात धरून जिना चढून वर येताना ते रविना धुंद होऊन जलपरीसारखी टेरेसवरील पाण्यात लोळत असेपर्यंत, कोरल्यागत आठवते. बीट-न-बीट, शब्द-न-शब्द, रविनाची अदा-न-अदा लक्षात आहे. मनात घर करून बसले आहे.
.
मला तरी हे गाणं *वन्स इन अ डिकेड* टाइप वाटते. ह्या संपूर्ण टीमसाठी, अलका याग्निक -उदित नारायण - आनंद बक्षी - विजु शाह - राजीव राय - अक्षय कुमार आणि स्पेशली रविनासाठी एकदा बघाच.
.
#रसग्रहण #मोहरा #रविना #टिपटिप
- काळे पुष्पक
वाचने
22111
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणतं गाणं आहे हे? खरच नाही
गाण्याची लिंक
ओह! टिप टिप बरसा पाणी. माफ
मान्य आहे, पण तुम्ही
ताल
In reply to मान्य आहे, पण तुम्ही by गवि
बाबाऊ
भारी गाणं आहे, शृगांरिक !
रविनाला पुर्वी सुंदरच दिसायची
अप्रतिम रसग्रहण
जो जे वंछिल तो ते लाहो।
In reply to अप्रतिम रसग्रहण by राजेंद्र मेहेंदळे
सुंदर !
छान गाणं. 4 वर्षा आधी मी
आपल्या आठवणी जागवल्या
In reply to छान गाणं. 4 वर्षा आधी मी by अमरेंद्र बाहुबली
भारीच रसग्रहण
दांडगा व्यासंग बुवा तुमचा..
In reply to भारीच रसग्रहण by ज्ञानोबाचे पैजार
भंगार आहे ते
In reply to दांडगा व्यासंग बुवा तुमचा.. by आनन्दा
त्या कॅनडातील पोरीने साडी
In reply to भंगार आहे ते by अभ्या..
वा वा
हो. ह्या दोन्ही गाण्यात ती
In reply to वा वा by तुषार काळभोर
पैलवान , ही दोन्ही गाणी
In reply to वा वा by तुषार काळभोर
हया तुम्ही तिचं अजून एक
In reply to वा वा by तुषार काळभोर
गोविंदा म्हणजे वेगळं विश्व
In reply to हया तुम्ही तिचं अजून एक by प्रमोद देर्देकर
पहिली
In reply to गोविंदा म्हणजे वेगळं विश्व by वपाडाव
आणि करिष्मा कपूर...
In reply to पहिली by तुषार काळभोर
बेश्ट!
In reply to वा वा by तुषार काळभोर
दूरदर्शनच्या बातम्या ?
परफेक्ट ! हेच वाटलं होतं.
In reply to दूरदर्शनच्या बातम्या ? by वकील साहेब
आयोव. हे तुम्ही म्हणालात
In reply to परफेक्ट ! हेच वाटलं होतं. by उगा काहितरीच
बेस्ट रे
हा "विश्वात्मा" सिनेमापण
In reply to बेस्ट रे by अभ्या..
धन्यवाद !
दक्षिणेकडील मिड नाईट साँग्ज
रविना सर्वाधिक गोड दिसली ती
टिपटिप?
असलं अलंकारिक गाणं! अन
In reply to टिपटिप? by गामा पैलवान
या गाण्याची ट्यून मात्र
हरकत नाही. त्यावेळी अनु मलिक
In reply to या गाण्याची ट्यून मात्र by गवि
"टीप टीप होने लगी, जादू चलने