वातापिगणपतिं भजेऽहम् ॥

लेखनविषय:
लेखनप्रकार
#जालावर आधीच प्रकाशित केला होता हा लेख. आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्त इथे देत आहे. हंसध्वनी- एक प्रसन्न असा 'ओडव-ओडव' राग. (ओडव-ओडव म्हणजे ज्याच्या आरोहात आणि अवरोहात प्रत्येकी पाच स्वर येतात असा राग) अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग- हंसध्वनी! हंसध्वनी हा 'बिलावल' थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध. असं म्हणतात, की बिलावल गात चालणार्‍या त्यागराजाचा पाय एका प्रेताला लागला, आणि ते प्रेत जिवंत झाले. (त्यागराज- कर्नाटक शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ.) ह्यावरून बिलावल (कर्नाटक पद्धतीतले बिलावलचे नाव 'बिलहरी') रागाला 'संजीवन राग' असे नाव पडले.

भावगीते..

लेखनविषय:
लेखनप्रकार
असेच आंतरजालावर भ्रमंती करताना मला e-snips वर काही भावगीते सापडली. या ठिकाणी मराठी भावगीतांचा चांगला संग्रह करण्यात आलेला आहे. ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर डाऊनलोडसुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी त्यांचा म्हणजे e - snips चा downloader bar तुमच्या संगणकावर उतरवून घ्यायला लागेल. खरे तर हा लेख मी खरडफळ्यावर टाकू शकलो असतो, पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला.

अनिल मोहिले यांचे निधन

लेखनविषय:
लेखनप्रकार
आत्ताच टीव्ही वर दुखःद बातमी पाहीली. ज्येष्ठ संगीतकार्/संगीतसंयोजक अनिल मोहीले यांचे निधन. ते अत्यंत ज्येष्ठ दर्जाचे संगीतसंयोजक होते. स्टाफ नोटेशन वर त्यांचे प्रभुत्व होते त्याच बरोबर ते अप्रतीम व्हायोलीनही वाजवायचे. मनःपुर्वक श्रध्दांजली.

ॐ मणी पद्मे हुं

लेखनविषय:
लेखनप्रकार
ॐ मणी पद्मे हुं - हा अतिशय मधुर असा तिबेटीयन मंत्र असून, हा अवलोकीतेश्वर या करुणामूर्ती बुद्धाचा मंत्र आहे. तिबेट, जपान, कोरीया, व्हिएतनाम,थायलंड आदि विविध देशातील बुद्धधर्मीय लोक या मंत्राचे उच्चारण करतात. वर म्हटल्याप्रमाणे, अवलोकीतेश्वर ही करुणेची देवता असून निर्वाणपद त्यागून ही देवता हालकष्टात पिचत असलेल्या प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी झटते अशी कथा/प्रवाद रूढ आहे. ॐ मणी पद्मे हुं हे संस्कृत रूप झाले तर याच मंत्राचे तिबेटी रूप ॐ मणी पेमे हुं असे आहे. अर्थात मंत्राच्या उच्चारणापेक्षा त्यामागील भाव हा महत्त्वाचा.

तात्यांना गाण्याच्या रसग्रहणाची विनंती

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय तात्या, परवा यु ट्युबवर शोध घेत असताना पुढील नितांता श्रवणीय गीत सापडले. कितीही ऐकले तरी मन काही केल्या भरतच नाही असे. या गीताखाली काही प्रतिसादांमध्ये असे वाचनात आले की गैरफिल्मी असे गीता दत्त या ज्येष्ठ गायिकेने गायले असून "बंगाली" पद्धतीचे हे गीत आहे. माझ्या विनंतीस मान देऊन, आपण या गाण्याचे रसग्रहण कराल काय? सुरवातीला उडत्या चालीचे हे गाणे नंतर मध्येच "विरह व्याकुळ" आलाप लेऊन सामोरे येते. विशेषतः - "बिरही गगन रोये" या ओळींपासून. येथे राग बदलला आहे का? हे गाणे मनावर इतकी जादू करते त्याचे कारण गीता दत्त यांचा स्वर्गीय आवाज केवळ की विविध (कदाचित) रागांची मनोहारी गुंफण?

एक बहारदार जुने गाणे

लेखनप्रकार
कधीकधी पूर्वी ऐकलेले एखादे गाणे मनात पुन्हा अचानक उतरते. मग ते काही दिवस मनात घर करून बसते. तसे मला अलिकडे मालती पांडेंच्या 'कशी रे तुला भेटू' ने वेढले आहे. http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu सुमारे १९४५ नंतर मराठीत भावगीतांचा नवा जमाना आला. ह्याची सुरूवात गजानराव वाटवे ब बबनराव नावाडीकर ह्यांनी केली. नंतर इतर अनेक कवि/ कवयित्रींच्या रचना घेऊन, अनेक नवनव्या गायिकांसह इतर संगीतकार त्यात उतरले. त्या गायिकांतील एक अग्रगण्या नाव म्हणजे मालती पांडे.

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..
Subscribe to संगीत